Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

फिलिट इन्स्टिट्यूटचा २० वा वर्धापन दिवस साजरा

पुणे:फिलिट इन्स्टिट्यूटने आजवर तीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना सलॅान जगताचे प्रशिक्षण दिले असून त्यातील अनेक माजी विद्यार्थी आज समाजासाठी मोलाची कामगिरी करत आहेत, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये दाखल होत आहेत आणि एकूणच सलॅान जगतात आघाडीवर आहेत.

अशा सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा तसेच इन्स्टिट्यूट मध्ये आत्ता ट्रेनिंग घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सलॉन अँपल फिलिट चे संस्थापक व संचालक सौ नयना चोपडे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच फिलिट इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांना त्यांच्या करियर मध्ये पुढे जाण्यास मदत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी entrepreneurship mindset ह्या विषयावर एक विशेष कार्यक्रम ‘दे आसरा’ फाउंडेशन चे डॉ आनंद गोडसे यांनी घेतला.

बिझनेस साठी फंड्स कसे मिळवावेत, नवीन सलॅान सुरु करण्यासाठी काय काय आवश्यक आहे ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि मार्गदर्शन ह्या कार्यक्रमातून विद्यार्थ्याना मिळाले.यावेळी सलॉन अँपल चे सिईओ आणि फिलिट चे संचालिका प्राची चोपडे आम्रे,फिलिट संस्थेच्या प्राचार्य नम्रता ताम्हणकर, फिलिट संस्थेच्या प्राचार्य मंजुश्री साळुंखे,सौ वर्षा मिरजकर, तन्वी,प्रीती उपस्थित होते.

Spread the love