Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थीनींना लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे संधी.

पुणे, ७ सप्टेंबर २०२३:   २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात बॅचलर ऑफ इंजीनियरिंग किंवा
डिप्लोमा नंतरचे इंजीनियरिंग आणि बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग, या अभ्याक्रमांना पहिल्या वर्षांत प्रवेश घेतलेल्या मुलींसाठी एक चांगली बातमी आहे. 

लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने
आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील परंतु शैक्षणिकदृष्ट्या होतकरू अश्या मुलींना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे
आव्हान केले आहे. ही संपूर्ण अभ्यासक्रमासाठीची मोफत शिष्यवृत्ती असुन आज ७ सप्टेंबर रोजी पत्रकार संघात झालेल्या एका पत्रकार परिषदेत लिला पुनावाला फाउंडेशनच्या सीईओ आणि ट्रस्टी प्रिती खरे यांनी ही माहिती दिली. 

 गेल्या २७ वर्षांत एलपीएफ ने महाराष्ट्रातील पुणे, वर्धा, अमरावती जिल्हा, नागपूर शहर, तेलंगणातील
हैदराबाद आणि कर्नाटक राज्यातील बेंगळुरूमधील १४,००० हून अधिक मुली आणि युवतींना शिष्यवृत्ती दिली आहे. याच बरोबर त्यांना विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम देखील उपलब्ध करून दिले आहेत.

आज त्यांच्यापैकी हजारो हून अधिक मुली या मोठ-मोठ्या उद्योग समुहांसोबत आणि उच्चस्थानी कार्यरत आहेत.

फाउंडेशच्या मदतीने या मुलीं आपल्या करिअर मध्ये खुप मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्या आहेत. आणि आज त्या
आपल्या परिवारास आणि अनुषंगाने समाजास देखील पाठिंबा देत आहेत. 

 ज्या मुलींनी २०२३-२०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातील कॉलेज/युनिवर्सीटीज मध्ये पहिल्या वर्षास पुढील पैकी
एखाद्या कोर्स साठी प्रवेश घेतला आहे – बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (४ वर्षे), डिप्लोमा नंतरचे बॅचलर ऑफ
इंजिनीअरिंग (३ वर्षे), बॅचलर ऑफ फार्मसी (४ वर्षे) किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग (४ वर्षे) आणि
आर्थिकदृष्या गरजू अशाच मुली फक्त या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे- इंजीनियरिंगसाठी – ९ सप्टेंबर, फार्मसीसाठी – १६ सप्टेंबर, डिप्लोमा
नंतरच्या इंजीनियरिंगसाठी – २७ सप्टेंबर आणि नर्सिंगसाठी – ७ ऑक्टोबर.

 पात्रता निकष नमुद असणारे शिष्यवृत्ती अर्ज हे https://www.lpfscholarship.com या संकेतस्थळा वर उपलब्ध आहेत. 

अधिक माहितीसाठी, अस्मिता शिंदे / निशाद पट्टेवाले यांच्याशी एलपीएफ कार्यालयच्या दूरध्वनी क्रमांकावर
संपर्क करता येईल. 

दूरध्वनी क्रमांक:०२०-२७२२४२६४/६५, मोबाइल नंबर: ८६६९९९८९८१ 

ईमेल-
 [email protected] (संपर्काची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी ११
ते सायंकाळी ४ पर्यंत ) 

अधिक जाणून घेण्यासाठी कृपया एलपीएफची
वेबसाइट https://www.lilapoonawallafoundation.com ला भेट द्या. 

त्वरा करा! ही सुवर्ण संधी चुकवू नका! प्रथम या आणि प्रथम मिळवा या तत्त्वावर मर्यादित ऑनलाइन फॉर्म
उपलब्ध आहेत.

Spread the love