Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अधिकाऱ्यांनी सेलिब्रिटी होण्यापेक्षा जनतेची कामे करण्याची गरज- पी एम आर डी ए चे आयुक्त डॉ सुहास दिवसे

पुणे. दि-14 नोव्हेंबर 2021-

अधिकाऱ्यांचा सेलिब्रिटी होण्याकडे कल वाढला आहे त्याऐवजी जनतेच्या कामास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत पीएमआरडीएचे आयुक्त डॉ सुहास दिवसे यांनी आज रविवारी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात व्यक्त करताना अधिकाऱ्यांना आवाहन केले-

शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे रविवारी पत्रकार भवन, नवी पेठ येथे 100 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीशिष्यवृत्ती प्रदान करण्याचा समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मासुम (महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ) या संस्थेस डॉ दिवसे यांच्या हस्ते शिवसह्याद्री आधारवड पुरस्कार 2021 हा पुरस्कार प्रदान करून खास सन्मान करण्यात आला संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रमेश अवस्थी व सहसंयोजिका श्रीमती जया नलगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला 31हजार रुपयांचा धनादेश, मानपत्र, शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते-

तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रसिध्द गिर्यारोहक कुमारी स्मिता घुगे, राष्ट्रीय जिमन्यास्टिक खेळाडू साहिल पांडुरंग मरगजे, भिषेकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या डॉकटर्स फॉर बेगर्स या संस्थेचे अध्यक्ष डॉ अभिजित सोनवणे आणि आय पी एस अधिकारी ओंकार पवार यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला –

याप्रसंगी डॉ दिवसे,मिटकॉन फाउंडेशन चे विश्वस्त व चेअरमन डॉ प्रदीप बावडेकर, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते-

डॉ दिवसे आपल्या भाषणात म्हणाले की, अनेक अधिकारी आजकाल सेलिब्रिटी होताना दिसतात आपण शासकीय सेवेत नागरिकांच्या कामासाठी आहोत सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे त्याकडे लक्ष दिले पाहिजे—

आयुक्त डॉ दिवसे पुढे म्हणाले की, आजचे युग कौशल्याचे आहे विद्यार्थ्यांना आपले स्वतःचे विचार प्रभावी पणाने मांडता आले पाहिजे संवाद साधता आला पाहिजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी केवळ अभ्यास च नव्हे तर आत्मविश्वास हवा आहे —

पालकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असेही डॉ दिवसे यांनी यावेळी सांगितले-

मिटकॉन चे चेअरमन डॉ बावडेकर यांनी भाषणात सांगितले की, विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी विशिष्ट ध्येय ठेवले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे –

अतिरिक्त जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले की, स्पर्धा परीक्षा चे मार्केटिंग भरपूर केले जात आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिपर मार्गदर्शन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शिक्षणामुळे संधी मिळते त्याचबरोबर समानता मिळते-

सत्काराला उत्तर देताना मासुम संस्थेच्या सहसंयोजिका जया नलगे यांनी सांगितले की वंचीत घटकांना राज्यघटनेची मूल्ये समजून घेण्यासाठी प्रयत्न केले जातात आजही स्त्रियांवर होत असलेले अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात यावेळी आयपीएस अधिकारी ओंकार पवार व विजयालक्ष्मी सप्रे यांची ही भाषणे झाली-

फाउंडेशन चे अध्यक्ष कोंढरे यांनी प्रास्ताविक पर भाषणात सांगितले की, संस्थेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 1कोटी 50 लाख रुपयांच्या व्याजातून शिष्यवृत्ती दिली जाते –नितीन साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love