Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

एनआरडीसीच्या संचालकपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती

नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआरडीसी) च्या भारतातील तीन संचालकांपैकी एक म्हणून निवड

पुणे : नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआरडीसी) च्या भारतातील तीन संचालकांपैकी एक म्हणून पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांची नियुक्ती झाली आहे. मुंदडा यांच्या सामाजिक व उद्योग क्षेत्रातील सर्वोकृष्ट कार्याची नोंद घेता ही निवड करण्यात आली आहे.

एनआरडीसीची स्थापना भारत सरकारने सन १९५३ मध्ये विविध राष्ट्रीय आर अँड डी संस्था, विद्यापीठांमधून होणारे तंत्रज्ञान, माहिती, शोध, पेटंट प्रक्रिया यांचा प्रचार, विकास आणि व्यावसायिकीकरण करण्याच्या प्राथमिक उद्देशाने केली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सदर संस्था काम करते. आपल्या अस्तित्वाच्या गेल्या सहा दशकात आणि कॉर्पोरेट उद्दिष्टांच्या अनुषंगाने, एनआरडीसीने भारत आणि परदेशातील वैज्ञानिक व औद्योगिक समुदायाशी मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत आणि संशोधन संस्था, शैक्षणिक आणि उद्योगांचे विस्तृत जाळे विकसित केले आहे.

एनआरडीसीचे नवनियुक्त संचालक शेखर मुंदडा यांचे मूळ गाव अहमदनगर येथील कोपरगाव असून त्यांनी छोटया उद्योगाद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. प. पू. श्री श्री रविशंकर यांच्या सानिध्यात कार्य करताना त्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली. त्यामुळे आज ते आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, महा एनजीओ फेडरेशन अशा विविध संस्थावर कार्यरत आहेत.

एनआरडीसी ने विकसित तसेच विकसनशील दोन्ही देशांना तंत्रज्ञान आणि सेवा यशस्वीरित्या निर्यात केल्या आहेत. विशेषत: विकसनशील देशांमध्ये, विश्वसनीय योग्य तंत्रज्ञान, मशीन्स आणि सेवांचे स्त्रोत म्हणून एनआरडीसी ला ओळखले जाते.

अशा देशाच्या प्रगतीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या उच्चतम संस्थेमध्ये शेखर मुंदडा यांच्या नियुक्तीने उद्योग तथा संशोधन जगतात आनंद साजरा केला जात आहे. शेखर मुंदडा यांच्या उद्योग जगतातील अनेक गोष्टीचा उपयोग या सर्व क्षेत्रात होऊ शकेल.

शेखर मुंदडा म्हणाले, प्रयोगशाळांमध्ये माहितीचे व्यापारीकरण विकसित झाले आहे आणि आता उद्योगांच्या जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये पसरलेल्या विस्तृत तंत्रज्ञानाचे एक मोठे भांडार म्हणून याला ओळखले जाते,

उदा. कृषी आणि कृषी-प्रक्रिया, रसायनांसह कीटकनाशके, औषधे आणि फार्मास्युटिकल्स, जैव तंत्रज्ञान, धातूशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे, बांधकाम साहित्य, यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इ. याने ४८०० हून अधिक उद्योजकांना स्वदेशी तंत्रज्ञानाचा परवाना दिला आहे आणि मोठ्या उद्योजकांची स्थापना केली आहे.

Spread the love