Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राहूल नार्वेकर यांचे त्यांच्या दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले

आज विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी विधानभवन येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रथम प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ सदस्यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांना अध्यक्षीय आसनावर विराजमान केले.

मुंबई, दिनांक ३ - विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर यांची निवड झाल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले. श्री.नार्वेकर यांच्या बाजूने एकूण 164 सदस्यांनी मतदान केले.

राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै 2022 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात आज अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी ॲड. राहुल सुरेश नार्वेकर आणि राजन प्रभाकर साळवी या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

यानंतर झालेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदस्य अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी ॲड नार्वेकर यांना अध्यक्षांच्या आसनावर नेऊन स्थानापन्न केले. तत्पूर्वी आज सकाळी 11 वाजता वंदे मातरम् ने विशेष अधिवेशनाची सुरूवात झाली.

Spread the love