Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

नेहरु युवा केन्द्र पुणे, एकता योगा ट्रस्ट व संभाजी ब्रिगेड -मराठा सेवा संघ यांच्या वतीने जागतिक योग दिन साजरा

जागतिक योगदिना निमित्ताने ऐतिहासिक लाल महालात राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना योगासने करुन मानवंदना …
एकता योगा ट्रस्टचा योगा दिन पुणे शहरात आणि जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे सातवे वर्ष कोरूना चा प्रादुर्भाव असला तरी ऑनलाईन योगा पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा झाला.

नेहरू युवा केंद्र पुणे भारत सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत एकता योगा ट्रस्ट पुणे केंब्रिज विद्यालय संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा मराठा सेवा संघ पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर आणि जिल्हा उपनगरांमध्ये लाल महाल पुणे जेथे बाल शिवबांनी व जिजाऊ माता यांनी सोन्याच्या नांगर चालविला त्या ठिकाणाहून सर्व प्रथम शिवाजी महाराज व जिजाऊ माता यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून जागतिक योगा दिनाची सुरुवात सकाळी 6.30 वा एकता योगा ट्रस्टच्या फुरसुंगी शाखेतील साधकांनी योगा करुन केली. आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला गेला.

नेहरू युवा केंद्र पुणे आणि एकता योगा ट्रस्टचे दोन लाख लोकांसाठी ऑनलाइन ऑफलाइन योगा साधकांचा संकल्प केला होता तो सकाळी 11 वाजता पूर्ण झाला असे एकता योगा ट्रस्ट चे अध्यक्ष नाना निवंगुणे यांनी सांगितले कात्रज धनकवडी नरे धायरी वडगाव बुद्रुक सिंहगड रोड स्वारगेट लाल महाल येवलेवाडी आधी 28 ठिकाणी एकता योगा ट्रस्टचा आंतरराष्ट्रीय योगा डे साजरा केला गेला.

मुख्य केंद्र अभिजीत कदम क्रीडा संकुल व पुणे केंब्रिज पब्लिक स्कूलमध्ये ऑनलाइन दहा हजार विद्यार्थी व पालकांनी योगा केला गेला. तसेच ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय धनकवडी शाखा येथे ऑनलाइन ऑफलाइन केला.

सदर प्रसंगी नेहरू युवा केंद्र समन्वयक यशवंत मानखेडेकर, एकता योगा केंद्राचे अध्यक्ष नाना निवंगुणे, पुणे केंब्रिज विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत कुंजीर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सचिन आडेकर, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, स्थानिक नगरसेवक योगेश समेळ, दादा साळुंके, बिके सुलभा दीदी, विजयसिंह गुंड विद्यार्थी आघाडी, रवीकांत ढेरे संभाजी ब्रिगेड आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
📱 9422306342/
8087990343 

 

Spread the love