Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

भारतरत्न राजीव गांधी यांची ओळख विकासाभिमुख असण्याबरोबर ‘संवेदनशील नेतृत्वाची’ होती – नाना पटोले


पुणे दि २० ॲागस्ट
दिवंगत पंतप्रधान व देशाच्या संगणक क्रांतीचे जनक,
भारतरत्न राजीव गांधी यांची ओळख विकासाभिमुख असण्याबरोबरच ‘संवेदनशील नेतृत्वाची’ होती..

याचे स्पष्टीकरण, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी, त्यांचे स्वत:वर (विदेशात राजीवजींच्या सबकार्याने) झालेल्या शस्त्रक्रीये बाबतची वाच्यता करून दिले, ज्याची वाच्यता दस्तूरखूद राजीवजींनी केली असल्याचे वक्तव्य प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष मा नाना पटोले यांनी राजीव गांधी पुतळ्यास अभिवादन प्रसंगी केले, हा फरक व ही ‘राजकीय संस्कारांची उंची’ दोन परस्पर विरोधी पक्षाच्या नेत्यांची होती असेही नाना पटोले यांनी पूढे सांगितले व या संस्कारांची ऊणीव आज भासते आहे..

राजीव गांधी यांचे स्वभावनूरूप त्यांचा जयंतीदिन सदभावना दिन पाळणे हे याचेच द्योतक असल्याचे ही पटोले यांनी सांगितले…

पुणे शहरातील एकमेव ऊभारलेल्या कात्रज येथील प्राणी संग्रहालयाचे आवारातील ऊभारलेले राजीव गांधी स्मारक व पुतळ्यांच्या सुंदरतेती प्रशंसा करून या संकल्पनेचे प्रणेते गोपाळ तिवारी व त्यांचे मित्रपरीवार, सहकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले..

राजीव गांधी स्मारक समिती संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी स्वागत – प्रास्ताविक केले.. स्व राजीवजींच्या क्रीडा विषयक धोरणांमुळेच आदीवासी भागातील ‘खेडूत शिकारी’ लिंबारामला ‘ॲाल्ंम्पिक मध्ये पदक मिळू शकले’ व भारताची क्षमता सिध्द होण्यास सुरवात झाली..

सर्वश्री शरद रणपीसे, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, आबा बागूल, सौ कमलताई व्यवहारे, सौ सोनाली मारणे, श्रीरंग चव्हाण पाटील, आबा जगताप, अवधूत मते, सौ अर्चना शहा, इ इ उपस्थित आभार पुणे शहर काँग्रेस चे ऊपाध्यक्ष श्री सुर्यकांत मारणे यांनी मानले…

त्यांचे आगमन प्रसंगी महीला कार्यकर्त्यांनी ओवाळून स्वागत केले..!

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love