Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

नऱ्हे येथील रोजगार मेळाव्यात २५७ उमेदवारांना नोकरी 

सिंहगड रस्ता परिसरातील बेरोजगार उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँगेस व शिवराज्य समूह यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एकूण ६३० जणांनी सहभाग घेतला होता. यात २५७ उमेदवारांना कंपन्यांच्या वतीने ऑफर लेटर प्रदान करण्यात आले आहे. तसेच ११३ उमेदवार अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. 

नऱ्हे येथे रोजगार मेळाव्यात पेटीएम, एसबीआय बँक, आयसीआयसी बँक, कॅलिबर, रिलायन्स, क्युबिक्स ऑटोमेशन प्रा. लि., सिलॅरिस इन्फोर्मशन प्रा. लि. बीयुजी, डीबीएस मिंटेक, टाटा स्टीव्ही, ग्रोमेट, यशस्वी ग्रुप, वायएसएफ, बिग बास्केट, युरेका फोर्ब्स, जस्टडायल बीव्हीजी, एसबीआय लाईफ, इक्विटास स्मॉल फायनान्स, कॉरप्लेगल बिजनेस, इन्फिनिटी रिटेल, मॅक्स, मॅनपॉवर, कॅलिबर, पेटीएम सनश्री मॅनेजमेंट सर्विस प्रा. लि., एलआयसी ऑफ इंडिया, गुड वर्कर रिलायन्स व्ही फाईव्ह ग्लोबल आदी कंपन्यांचा सहभाग होता.

यावेळी एच आर विभागाकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींसाठी सिंहगड रस्ता परिसरातून ६३० उमेदवारांनी हजेरी लावली होती. त्यातील २५७ उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर प्रदान करण्यात आले असून ११३ उमेदवार अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.     

राष्ट्रवादी युवक काँगेसचे सरचिटणीस भुपेंद्र मुरलीधर मोरे म्हणाले, करोना काळात मोठ्या प्रमाणात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या त्यासाठी आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केला होता. यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील अनेकांना रोजगार मिळाला असून ज्यांना रोजगार मिळाला नाही त्याच्यासाठी आम्ही वर्षभर नोकरीसंदर्भात अपडेट देत राहणार आहोत. 

Spread the love