Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

भेंडा खुर्दचे कृषीमित्र व पत्रकार संदिप नवले यांचा नगरला झाला सन्मान

कृषी दिनानिमित्त नगरला प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव

नगर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन व कृषी संजीवन सप्ताह समारोपप्रसंगी राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकरी, पीक स्पर्धेतील शेतकऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्दचे कृषीमित्र व पत्रकार संदिप नवले यांचा सन्मान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे. आत्माचे प्रकल्प संचालक विलास नलगे, उपसंचालक राजाराम गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. विक्रम कड, कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांच्या हस्ते करण्यात आला.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन व कृषी संजीवन सप्ताह समारोप कार्यक्रम शनिवारी (ता.१) झाला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, कृषी उपसंचालक किरण मोरे, क्रांती चौधरी, कृषी अधिकारी प्रमोद साळवे, रवींद्र तागड, सारंग दुगम, तंत्र अधिकारी शिल्पा गांगर्डे, अमृत गांगर्डे, प्रवीण गोरे, प्रकाश महाजन, प्रकाश आहेर, कौस्तुभ कराळे, पल्लवी लोहाळे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील कृषिभूषण, उद्यानपंडित, शेतीमित्र, कृषिनिष्ठ, जिजामाता आदी कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी, पीक स्पर्धेतील शेतकरी, बिरसामुंडा स्वावलंबन योजनेतून यशस्वी शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांसह विक्रम कड, विलास नलगे, राजाराम गायकवाड, प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ, शैलजा नावंदर, क्रांती चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मेहेत्रे यांनी केले, तर आभार नीलेश कानवडे यांनी मानले.

Spread the love