Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मुळशीतील विदयार्थ्यांची पायपीट थांबणार

मा जिल्हा परिषद सदस्य शांताराम दादा इंगवले व मुळशी तालुक्याचे मा सभापती रविंद्र (बाबा) कंधारे यांच्या विनंतीला मान देऊन

श्री.प्रकाश भाऊ ढोरे (संचालक पीएमपीएल) व पीएमपीएल अधिकारी वर्पे साहेब यांनी मार्केटयार्ड ते काशिग, मार्केटयार्ड ते भादस संभवे, चिंचवड ते कातरखडक या बसमार्गाची दिनांक 22 रोजी पाहणी केली. दरम्यानच्या सर्व गावामध्ये त्यांच स्वागत व सत्कार करण्यात आला.

मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागात पाहणी करत असताना रावडे, खुबवली, भादस शिळेश्वर, असदे गावडेवाडी या भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी सात- आठ किमी होणारी पायपीट लक्षात आली .

तसेच कोळवण खोऱ्यातील काशिग,हाडशी गावातील आदिवासी बांधव, विदयार्थी , नोकरदार,शेतकरी, दुग्धव्यवसायिकाची वाहतूक विषयक समस्या जाणून घेतली.ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, दुग्ध व्यावसायिक, कामगार वर्गाला पुणे शहरात सोयी नुसार ये-जा करता यावी.

याकरता 1 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त या सर्वाना सोयीस्कर वेळेप्रमाणे बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण भागातील वाहतूकीचा कणा असलेली एसटी बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता.

पण बससेवा सुरू होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनी श्री प्रकाश भाऊ ढोरे, श्री वर्पे साहेब, श्री शांताराम दादा इंगवले, श्री रविंद्र (बाबा) कंधारे व इतर मान्यवराचे स्वागत केले.

Spread the love