Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर ट्रक ड्रायव्हराना चाकूचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर ट्रक ड्रायव्हराना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

दिनांक 12/06/2021 रोजी रात्री 00.48 वा फिर्यादी नामे दुर्गाप्रसाद जगत कहर वय 27 धंदा ड्रायव्हर रा.उत्तरप्रदेश हे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर ताजे पेट्रोल पंप येथे रस्त्याचे बाजूला त्याचे ट्रक मध्ये झोपलेले असताना चार अनोळखी इसमानी त्यांना मारहाण करून त्यांचे गाडीच्या कप्प्यामध्ये असणारी रक्कम 70,000/- जबदस्तीने काढून घेतली . नमूद मजकुरावरून कामशेत पो स्टे गु र न 143/2021 भा द वि 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता .

मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे वरती जबरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक डॉ. श्री अभिनव देशमुख सो यांनी दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गोपनीय माहितीचे व तांत्रिक विश्लेषण आधारे सदर चे गुन्हे हे खालापूर येथील एक टोळी करीत असल्याचे समजले त्याप्रमाणे मौजे मोरबेवाडी चौक ता.खालापूर जि. रायगड येथून आरोपी नामे

1)गणेश हरिभाऊ वाघमारे वय 28 रा.चौक मोरबेवाडी ता.खालापूर जि रायगड 2) संतोष उर्फ मंगल्या वाघमारे वय 21 रा.चौक मोरबेवाडी ता.खालापूर यांना ताब्यात घेतले असता त्यांनी कामशेत हद्दीत 02 व तळेगाव दाभाडे हद्दीत 03 असे एकूण 05 गुन्हे त्यांचे खालील साथीदार आरोपी सोबत केल्याचे सांगितले *3)संतोष उर्फ मलिक मारुती हिलम रा.रामवाडी ता.खालापूर जि.रायगड
4)रोहिदास जाधव रा.वरोसे वाडी ता.खालापूर
5)राकेश वारे रा.परळी ता.सुधागड जि.रायगड
यांचे सोबत मिळून खालील प्रमाणे गुन्हे केले असल्याचे कबूल केले आहे..
*

1)कामशेत पो स्टे गु र न। 277 /2021 भा द वि 394,34
2) कामशेत पो स्टे गुरन 143/2021 क.394 ,34
3)तळेगाव दाभाडे पो स्टे हद्दीत 3 गुन्हे असे एकूण 5 गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे
नमूद आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर खुनाचा प्रयत्न,दरोडा,जबरी चोरी ,चोरी, गंभीर दुखापतीसह मारामारी असे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1)गणेश हरिभाऊ वाघमारे वय 28 रा.चौक मोरबेवाडी ता.खालापूर जि. पुणे
1)खालापूर पो स्टे गु र न 149/2015 भा द वि 307,324

2) संतोष उर्फ मलिक मारुती हिलम वय 28 रा.विनगाव ता.खालापूर जि. रायगड
1)खालापूर पो स्टे गु र न 98/2017 भा द वि 395
2)खोपोली पो स्टे गु र न 169/2015 भा द वि 394,34
3)लोणावळा शहर पो स्टे गु र न 58/2005 भा द वि 395
4)खोपोली पो स्टे गु र न 231/2019 भा द वि 393,34
3)रोहिदास हरी जाधव वय 27 रा.वरोसेवाडी ता.खालापूर जि. रायगड
1)कर्जत पो स्टे गु र न 135/2016 भा द वि 454,380
2)कर्जत पो स्टे गु र न 111/2016 भा द वि 457,380
3)कर्जत पो स्टे गु र न 107/2016 भा द वि 394,34
4)खालापूर पो स्टे गु र न 194/2016 भा द वि 427,380

सदर ची कामगिरी ही मा.डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.नवनीत कॉवत उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा , स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, कामशेत पोस्टेचे पो नि संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, सफौ शब्बीर पठाण, सुनील जावळे, काशीनाथ राजापूरे, पोहवा मुकुंद अय्याचित, सचिन गायकवाड , प्रकाश वाघमारे , पोकॉ बाळासाहेब खडके यांचे पथकाने केली आहे.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love