Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

माता भगिनींचा सन्मान कर्वेनगर चा शाश्वत विकास

हे ब्रीद घेऊन स्थापन झालेल्या कर्वेनगर परिवर्तन आघाडी नुकताच तिळगुळ समारंभ व महिलांच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला… येता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कर्वेनगर मध्ये परिवर्तन करण्याचा दृढनिश्चय या कार्यक्रमात महिला भगिनींनी केला.

कर्वेनगर मधील शिवसेनेचेज्येष्ठ कार्यकर्ते श्री चंद्रकांत आप्पा बराटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष श्री माणिक शेठ दुधाने राज्य कृषी व ग्रामीण पर्यटनाचा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे वनदेवी सेवा संस्थनाचे विश्वास्थ श्री बाळासाहेब खंडोबा बराटे, सामाजिक कार्यकर्ते सुनील तोडकर, सामाजिक कार्यकर्ते संजय साळुंखे कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे संस्थापक सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी राज्य शासनाच्या व पुणे महानगरपालिकेच्या महिला सक्षमीकरण योजना राबवणार तसेच कर्वेनगर चा शाश्वत विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे उडान महिला मंचाच्या तेजलताना दुधाने यांनी याप्रसंगी सांगितले.

कर्वेनगर मध्ये ससून च्या धर्तीवर हॉस्पिटल प्र शास्त्र उद्यान विरंगुळा केंद्र, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय योजना होणे गरजेचे आहे असे मत काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर यांनी मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात च्या संगीताताई बराटे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख सौ वैशालीताई दिघे, शिवसेनेचे श्री नंदू घाटे, भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे विनोद मोहिते,लोकसेवक प्रवीण दुधाने राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद उर्फ बंडू तांबे मनसेचे आनंद उर्फ बंडू पाटील , मनसेचे सचिन विप्र , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष कुमार बराटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
हळदी कुंकू समारंभ कर्वेनगर व परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

Spread the love