Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.

विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार च्या विकासपर्वाचा हा विजय आहे. सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास आणि सबका प्रयास या घोषनेनुसार काम करत राष्ट्राला प्रगती पथावर नेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा हा विजय असल्याचे भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर म्हणाले.

या विजयात भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान असून ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रानी सर्वांच्या साथीने रावणाची लंका उध्वस्त केली, रावणाचा अहंकार नेस्तनाबूत केला त्याच पद्धतीने देशातली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून भारताच्या प्रगतीच्या आड येणाऱ्यांना धूळ चारत आहे.

हा विजय 2024 च्या लोकसभा निवडणुकीची नांदी असून पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्ष 400 चा आकडा पार करतील असा विश्वास देखील संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.

सोशल मीडिया वर कार्यरत मोदी विरोधकांना ही चपराक असून विरोधकांनी मोदी द्वेषातून केलेल्या गलिच्छ पोस्ट आता तरी डिलीट करावेत आणि मोदी द्वेष सोडून द्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नांतील “जगाचे नेतृत्व” करू पाहणाऱ्या शक्तिशाली भारताच्या निर्मितीच्या आड आता कोणी येऊ नये आणि जनादेशाचा स्वीकार करून रोज उठून गरळ ओकणे बंद करावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.

Spread the love