Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मोशीतील किसान कृषी प्रदर्शनात थेऊरच्या राइज एन शाइन बायोटेकचा सहभाग.

पुणे : भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ला बुधवारपासून (ता. १३) सुरुवात झाले आहे हे प्रदर्शन रविवार (ता.१७) पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी (भोसरीजवळ) पुणे येथे सुरू आहे.

हे प्रदर्शन १५ एकर क्षेत्रांवर असून, या ठिकाणी ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.

या प्रदर्शनामध्ये बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील फ्लोरिकल्चर व टिशू कल्चरमध्ये अग्रेसर असणारी कंपनी राईस अँड शाईन सहभागी झाले आहे नानाविध प्रकारचे फुल व फलोत्पादन 27 देशांमध्ये एक्सपोर्ट होणाऱ्या वनस्पती या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहेत यात प्रामुख्याने जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, स्पॅथिफिलम, कॉर्डिलिन, अल्पिनिया, पेरेनिअल्स, लिमोनियम, जिप्सोफिला, लिमोनियम, हायड्रेंजिया फुलांच्या जाती नर्सरी विभागांतर्गत फुलाच्या जाती अँथुरियम, गुझमनिया, पॉइन्सेटिया, कलांचो, क्रायसॅन्थेमम, फॅलेनोप्सिस
तसेच फळांमध्ये केळी (ग्रँड नैन, येलक्की आणि लाल केळी)अननस, स्ट्रॉबेरी या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत.

“आज या किसान प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील अनेक शेतकऱ्यांना नवनवीन उत्पन्न घेण्यास मार्गदर्शक मदत मिळत आहे शेतकऱ्यांचा कृषी अभ्यास घडत आहे. कृषी क्षेत्रात प्रगतीच्या विकास वाटा या किसान प्रदर्शनाच्या माध्यमातून खुल्या झाल्या आहेत. आज आमच्या सारख्या अनेक कंपन्यांना या प्रदर्शनाच्या व्यासपीठावर उभे राहून अनेक शेतकऱ्यांना पाठबळ देत आहे” असे मत बायोटेकच्या संस्थापिका डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले.

डॉ भाग्यश्री पाटील या स्वतः प्रदर्शनात उपस्थितीत राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांचे मनोबल वाढवले.

हे प्रदर्शन पाच दिवस सुरू असून, आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघू उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. प्रदर्शनात कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी ‘स्पार्क’ हे दालन आहे. ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान व नवीन कल्पनांना चालना देण्यात आली आहे.

Spread the love