Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मोदी शहांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडल्यामुळे गुरूदक्षिणा म्हणून शिंदे – फडणवीस यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला दिला.

महाविकास आघाडी सरकारने तरुणांच्या हितासाठी फोक्सकोन – वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणला. मात्र आत्ताच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशाने हा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. या निर्णयाविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्या तळेगाव एम आय डी सी मध्ये हा प्रकल्प प्रस्तावातील होता, त्या वडगाव मावळ परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. या निर्णयाविरोधात वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिंदे फडणवीस सरकारचा व केंद्र सरकारचा तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना शिंदे आणि फडणवीस उद्योग, कंपन्या गुजरातला देऊन कशाप्रकारे मोदी-शहा यांची दलाली करत आहेत याची काही उदाहरणे दिली.

देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले.

१) बीकेसी मुंबई येथे होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र.
२) MIAL चे मुंबईत होणारे कार्यालय.
३) पालघरची नॅशनल सेक्युरीटी गार्ड व मरीन पोलीस अकादमी.
४) एअर इंडियाचे मुंबईतले कार्यालय.
५) मुंबईतील शिप ब्रेकिंग उद्योग.
6) मुंबईतला हिरे उद्योग.
हे उद्योग,संस्था गुजरातला नेण्यात आल्या.

शिंदे-फडणवीस यांच्या डोळ्यादेखत महाराष्ट्राची लूट चालू आहे. आणि आता शिंदे फडणवीस सरकार असताना पुण्यातील तळेगाव मध्ये होणारा फॉक्सकॉन-वेदांता हा प्रकल्पसुद्धा गुजरातला नेण्यात आला.

‘मीठ खायचे महाराष्ट्राचे आणि चाकरी करायची गुजरातची’ या पद्धतीचे हे शिंदे फडणवीस सरकार आहे.

यावेळी मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.सुनिल आण्णा शेळके पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.प्रदीप गारटकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. गणेश खांडगे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिनजी घोटकुले, गणेशजी काकडे, भानुदासजी खळदे, मारुतीजी भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस रुपालीताई दाभाडे, विद्याताई घराडे तसेच वडगाव मावळ गावातील ग्रामस्थ, तसेच युवक, विद्यार्थी व महिला आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love