Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

पंजाबसह सर्व राज्यात अल्पसंख्यक मोदींसमवेत : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा

अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती‘ अल्पसंख्यांक आयोग अध्यक्षांच्या उपस्थितीत रोजा इफ्तार ‘ संवाद कार्यक्रम

‘भारतात अल्पसंख्यकांची प्रगती होत आहे. भेदभावाच्या घटना जगात होत असल्या तरी भारतात होत नाहीत. अल्पसंख्यक आयोग तातडीने या घटनांची दखल घेते.समाजाची सेवा करण्यावर भर द्यावा, राजकारण करू नये, असाच पंतप्रधानांचा संदेश आहे. त्यामुळे पंजाबसह सर्व राज्यात अल्पसंख्यक मोदींसमवेत आहेत, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगीतले.

अमृत पाल प्रकरणी पंजाब मध्ये अस्वस्थता नाही.पंतप्रधानांनी पंजाब, शीख समुदायाच्या प्रश्नांमध्ये लक्ष दिले आहे. अनेक उपक्रमांमुळे हा समुदाय पंतप्रधानांसोबत आहे. अमृतपाल कोणीही नाही, त्याचे योगदान नाही. उगाच गवगवा केला जात आहे. राज्य सरकारने कारवाई करावी, केंद्र सरकार पाठीशी राहील.आप ने भ्रमनिरास केला आहे. हे सर्वांच्या लक्षात आले आहे, असेही लालपुरा यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्यात ‘रोजा इफ्तार ‘ आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सोमवार, दि. १७ एप्रिल २०२३,सायंकाळी ६.३० वाजता,इमामवाडा, गीता सोसायटीसमोर, रोझरी स्कुल लेन( कॅम्प ,पुणे ) येथे हा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती केल्याचे पत्र यावेळी देण्यात आले.

त्या आधी दिवसभरात इक्बालसिंह लालपुरा यांनी डॉ.पी. ए. इनामदार, डॉ.परवेझ ग्रँट, फिरोझ पदमजी,सॉलोमन सोफर, डॅनियल पेणकर यांच्यासह अल्पसंख्य समुदायातील अनेक मान्यवरांची भेट घेतली. सरकारी अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली.

इमामवाडा येथे बोलताना लालपुरा म्हणाले, ‘अल्पसंख्यक समुदायाची प्रगती हीच देशाची प्रगती आहे.आज मी पुण्यात अल्पसंख्य समुदायाच्या भेटी घेतल्या. अल्पसंख्य समुदायाला प्रगती करायची आहे. तो विश्वास मिळत आहे, असेच या सर्वांनी सांगितले.पंतप्रधानांच्या धोरणानुसार आम्ही कार्यरत आहोत.भारत वेगाने प्रगती करीत आहे. जग या प्रगतीची दखल घेत आहे. भाजपा क्रमांक एक चा पक्ष आहे. या पक्षात अल्पसंख्यकांना यावेसे वाटते , त्यांचे स्वागत आहे. इमामवाडा येथील कार्यक्रमात सॉलोमन सोफर, डॅनियल पेणकर, चरणजितसिंह साहनी, मौलाना झैदी हे अल्पसंख्य समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते

अनेक मान्यवरांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी राजेश पांडे म्हणाले, ‘ सर्वांचा विश्वास मिळवून सर्वांना प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत. पक्षात आलेल्या सर्वांचे स्वागत आहे. अफवा, चुकीच्या चर्चांवर विश्वास न ठेवता पक्षावर विश्वास ठेवावा.

यावेळी मुस्लिम व ज्यू समाज बांधवांनी एकत्रित रोजा इफ्तार करुन उपवास सोडला.राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘मिलेट अँड वॉटर वुमन ऑफ इंडिया’ शर्मिला ओसवाल याही उपस्थित होत्या. भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, भाजपचे राज्य प्रवक्ते अली दारुवाला, नितीन सोनटक्के,अजय खेडेकर, दीपक नागपुरे यांच्या उपस्थितीत मुस्लिम, ज्यू, पारसी, इराणी व ख्रिश्चन समाजातील २ हजार मान्यवर व्यक्तींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Spread the love