Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

म्हाळुंगे_मुख्य रस्त्याचे भुमिपुजन संपन्न – नगरसेवक अमोल रतन बालवडकर

आज म्हाळुंगे येथील #मुख्य_रस्त्याचे_डांबरीकरण व साईड पट्टीचे काम करणे या कामाचा भुमिपुजन समारंभ भारतीय जनता पार्टी व म्हाळुंगे ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कामासाठी पुणे मनपाच्या PMC Pune मुख्य खात्यातुन व महापौर श्री.मुरलीधरजी मोहोळ यांच्या विशेष सहकार्यातुन रक्कम रु.४० लक्ष रुपयांची तरतुद उपलब्ध करण्यात आली आहे.

"पुणे मनपा हद्दित नव्याने समाविष्ठ झालेल्या सुस-म्हाळुंगे गावांमध्ये स्थानिक नागरीकांच्या मुलभुत गरजा ओळखुन विविध विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करण्यात येईल व तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन अतिशय नियोजित असा विकास केला जाईल." असे मत यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिकेत समाविष्ठ झाल्यानंतर या गावांतील पाणी समस्या संपुष्टात आली असुन रस्ते, ड्रेनेज व इतर सुविधांची कामे भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन झपाट्याने व अगदी नियोजनबद्ध पद्धतीने होत असल्याचे सांगत म्हाळुंगे गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, लहुशेठ बालवडकर, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, मंदार राराविकर, काळुराम गायकवाड(मा सरपंच महाळुंगे), संजय पाडाळे, राजेंद्र पाडाळे, मा.उपसरपंच सुनिल पाडाळे, उपाध्यक्ष भाजपा मुळशी तालुका भानुदास कोळेकर, रविंद्र मोहोळ, सह्याद्री प्रतिष्ठाण संपर्क प्रमुख पुणे जिल्हा .सदाशिव मोरे, बाबासाहेब तारे, अंकुश पाडाळे, तुषार हगवणे, गणेश पाडाळे, गुलाब गायकवाड, मा चेअरमन सुरेश कोळेकर, समीर कोळेकर, लक्ष्मण पाटील, राजेंद्र पाडाळे, माउली सुतार, हॅाटेल रुपा सचिन पाडाळे, नामदेव गोलांडे (मा सरपंच) भानुदास पाडाळे (मा ग्रामपंचायत सदस्य), सोपानआण्णा पाडाळे (हाॅटेल राधा) अंशाआका पाडाळे, दातीर मायी, शिवाजी खैरे, भगवान खैरे, मनोज पाडाळे, बाबासाहेब कोळेकर, गीताताई गुजर, मा.सरपंच नामदेव पाडाळे, गुलाब पाडाळे, मयुर कोळेकर, संतोष बबन पाडाळे बाबुराव मोहोळ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

BJP Pune Municipal Corporation BJP Pune BJP Maharashtra Chandrakant Patil Girish Bapat Jagdish Mulik Murlidhar Mohol Smart Pune

Spread the love