Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

माता जिजाऊ प्रतिष्ठाण तर्फे मोफत लसीकरण आयोजक : नगरसेवक अनिल टिंगरे

शहरात लसीचा तुटवडा असल्याने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध होत नाही. खासगी दवाखान्यात जादा दराने लस विकली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लस मिळणे जिकरीचे झाले आहे.

सर्व सामान्य नागरिकांची ही गरज ओळखून धानोरीतील माता जिजाऊ प्रतिष्ठाण ने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिली आहे.

प्रतिष्ठाण मार्फत गेल्या रविवारी ४०० नागरिकांना मोफत लस देण्यात आली. या रविवारी (दि.४ जुलै) रोजी ६०० नागरिकांना मोफत लस उपलब्ध केली आहे.

नियोजनबद्ध राबविलेल्या या लस मोहिमेबद्धल नागरिक देखील समाधान व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रतिष्ठाण मार्फत यापुढे देखील हा उपक्रम सुरूच ठेवण्याचे नियोजन केले आहे.


प्रतिष्ठाण च्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांची गरज असून आपण लसीकरण मोहिमेचे कव्हरेज देण्यासाठी रविवार (दि.४) रोजी सकाळी १० वाजता आवर्जून उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

प्रमुख उपस्थिती :- महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे 

संयोजकः नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे 

पत्ता :- आनंद पार्क, बहुउद्देशीय हॉल, लाटोरा सोसायटी मागे, धानोरी, पुणे.
मो. 73859 87996

Spread the love