Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

संविधानाचा मराठी अनुवाद फक्त रात्रशाळा शिक्षक प्रा. नागेश सोपान हुलवळे ( सुमनसुत ) यांनी केला आहे.

आपणांस पृथ्वी संघराज्य संविधानाच्या मराठी आवृत्ती विषयी माहिती आहे का ?

प्रत्येक देशाचे भवितव्य त्या देशाच्या संविधानावर अवलंबून असते . आपल्या पृथ्वीचे सुद्धा संविधान आहे. डॉ . ग्लेन टी. मार्टिन (जन्म 22 जानेवारी 1944) हे एक अमेरिकन तत्त्वज्ञ, लेखक आणि समाजसुधारक आहेत. ते एक संशोधक, शिक्षक देखील आहेत आणि यूएसए आणि परदेशातील अनेक संस्थांमध्ये प्रशासकीय पदांवर आहे . त्यांनी पृथ्वीच्या संविधानाची निर्मिती केली आहे .

दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये खासदार गोविंदराव आदिक सभागृहात या पृथ्वी संघराज्याच्या संविधानाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन खुद्द डॉ. ग्लेन टी मार्टीन यांच्या हस्ते करण्यात आले आहे .

संविधानाचा मराठी अनुवाद फक्त रात्रशाळा शिक्षक प्रा. नागेश सोपान हुलवळे ( सुमनसुत ) यांनी केला आहे. प्रा. नागेश सोपान हुलवळे यांचा अकोले तालुक्यातील जांभळे या छोट्याशा खेड्यात जन्म झाला .

त्यांना जागतिक संविधानाचे मराठी भाषेत भाषांतर केल्याबद्दल WCPA आंतरराष्ट्रीय विश्वस्नेही पुरस्कार – २०२२ प्रदान देऊन गौरविण्यात आले आहे . आणि जागतिक संविधान संसद संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले .

ह्या प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . WCP चे डॉ. दत्ता विघावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . डॉ. ग्लेन टी मार्टीन यांनी भारत देशाला युनोत स्थायी समितीचे सदस्यत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .

सदर प्रकाशन सोहळा खालील यूट्यूब लिंकवर क्लिक करून पाहता येईल .
https://youtube.com/watch?v=CDrXdLUsNJ4&feature=share

Spread the love