काँग्रेस स्वबळावर पुणे महानगरपालिका लढायला सक्षम- रमेश बागवे (काँग्रेस, पुणे शहराध्यक्ष )
पुणे, २४ जुलै २०२१: खोटी आश्वासने आणि जनतेला आशेवर ठेवून सत्ता टिकत नसते त्यासाठी योग्य कामे देखील करावी लागतात.

केंद्रात असो किंवा पुणे महानगरपालिकेत असो भारतीय जनता पक्षाने फक्त जाहिरातबाजी करून जनतेला अंधारात ठेवण्याच काम केल आहे.
पुण्यातील नागरीक हा सुज्ञ आणि समजदार असून त्यांना योग्य विचारांची पराख आहे.

येत्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचे प्रमाण देखील सगळ्यांना पहायला मिळेल.

प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्याला नानासाहेब पटोले यांचे खंबीर नेतृत्व लाभले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवायला सक्षम आहे.

असे मत पुणे शहरातील काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी मंडई विद्यापीठ कट्टावर व्यक्त केले.

आज मंडई विद्यापीठ कट्टावर काँग्रेस पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते आबा बाबूल, प्रदेश प्रवक्ता गोपाळदादा तिवारी, माजी नगरसेवक अभय छाजेड, माजी नगरसेवक संजय बालगुडे आदी पदाधिकारी आमंत्रित करण्यात आले होते.
शहराच्या विविध प्रश्नावर, राजकीयदृष्ट्या शहरातील कामे व विकास योजना कशा पद्धतीने राबविण्यात याव्यात या मुद्यावर विषेश लक्ष केंद्रित करून आज कट्टावर चर्चा झाली.
मंडई विद्यापीठ कट्टा, पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्या वतीने सर्व आमंत्रित मान्यवराचा सन्मान सत्कार देखील करण्यात आला.

बाळासाहेब मालुसरे म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून दर शनिवारी मंडई विद्यापीठ कट्टावर विविध क्षेत्रातील अभ्यासक मान्यवर येतात, विवीध विषयावर चर्चा करतात व त्यातून येणारे समविचार समाजासाठी कशे उपयुक्त ठरेल यावर मिमांसा केली जाते.
त्याच क्रमांत राजकारणाच्या दृष्टीने पुणे शहर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी आमंत्रित केले होते.

येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कशी भुमिका घेऊन काम करेल यावर आज चर्चा झाली.
येत्या काळात एक एक करून सर्व प्रमुख पक्षाना आम्ही कट्टावर आमंत्रित करणार आहोत असेही ते म्हणाले.
जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !