Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मंडई विद्यापीठ कट्टा, पुणे तर्फे ‘कोरोना देवदूत गौरव पुरस्कार’

माणसा माणसातले प्रेम तर दुसरीकडे नातेसंबंधातला दुरावा कोरोनाने दाखवला; सतिश गोवेकर यांचे प्रतिपादन

पुणे, १० जुलै २०२१: कोरोना काळ हा कुणालाही न विसरता येणार असा जीवनाचा अविभाज्य एक अध्याय आहे.

स्वप्नातही कल्पना करता येणार नाही असे अनेक उदाहरण या काळात प्रत्यक्षात पाहायला व अनुभवायला मिळावे हे जीवनाचे व निसर्गाचे वास्तव्य म्हणावे लागेल.

पोलीस क्षेत्रात काम करत असल्याने बहुतांश सर्व घटना, माणसा माणसातले प्रेम तर दुसरीकडे सख्या नातेसंबंध कशे दुरावले जवळून पाहता आले, आदी अनेक अनुभव सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांनी मंडई विद्यापीठ कट्टावर व्यक्त केले.

कोरोना काळात आहोरात्र देवदूत म्हणून सेवा केलेल्या व्यक्तींचा मंडई विद्यापीठ कट्टा, पुणेच्या वतीने कोरोना देवदूत म्हणून गौरव करण्यात आला.

आज शनिवार दिनांक १० जुलै रोजी मंडई विद्यापीठ कट्टा,पुणे चे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्या वतीने आयोजित केलेला हा कोरोना देवदूत गौरव पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात योगदान देऊन हजारो लोकांना नविन जीवान देणारे डॉक्टर औसफ शेख व डॉक्टर नितीन बोरा यांना तर स्वतःच्या जीवची पर्वा न करता सुरक्षा रक्षक म्हणून सेवा देणारे पोलीस क्षेत्रातील सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हिणे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी सन्मानार्थींसोबत शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, कसबा विधानसभा समन्वयक संतोष भुतकर, हर्षद मालुसरे उपस्थित होते.

आजच्या या कट्टावर आरोग्यविषयक समस्या व त्यावरील उपय योजना तसेच पोलीस आणि लॉकडाऊन या विषयावर चर्चा झाली. गेल्या सात वर्षांपासून दर शनिवारी मंडई विद्यापीठ कट्टावर विविध क्षेत्रातील अभ्यासक मान्यवर येतात, विवीध विषयावर चर्चा करतात व त्यातून येणारे सदविचार समाजासाठी कशे उपयुक्त ठरेल यावर मिमांसा केली जाते असे मंडई विद्यापीठ कट्टा, पुणे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप✒️
पत्रकार-छायाचित्रकार
📱 9422306342 / 8087990343

Spread the love