Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मंडई म्हसोबा उत्सवाला धार्मिक विधी व पुष्पसजावटीने प्रारंभ – अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव

पुणे : विविधरंगी फुलांनी साकारलेली १५ फूट उंचीची आकर्षक पुष्पआरास आणि धार्मिक विधींनी मंडईतील म्हसोबा मंदिरात म्हसोबा उत्सवाला प्रारंभ झाला. प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन यांसह महाआरती देखील करण्यात आली.

मंडई म्हसोबा मंदिराच्या परिसरात पुष्पसजावटीसोबतच विविधरंगी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी मंदार मोकाशी व गिरीजा मोकाशी पाटील यांच्या श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन पार पडले. तर, दुपारी पृथ्वी गणेश भिंताडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती झाला.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, आशिष पालकर, केदार कळसकर, शशांक गोसावी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले यांनी पुष्पसजावट केली.

धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे उत्सवाचे वैशिष्टय असणार आहे. त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या प्रदान करण्याचा उपक्रम, पोलिसांना बॅरिकेट्स देण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच, दीप अमावस्येनिमित्त दीप पूजन व दीपोत्सव करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होणार आहे.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीं चा रुद्राभिषेक व होमहवन पार पडले. तसेच मंदिराला करण्यात आलेली आकर्षक पुष्पआरास.

Spread the love