Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मंडई म्हसोबा उत्सवाला अध्यात्मिकतेसोबत सामाजिक जोड –
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या उत्सवात ढोल-ताशा वादन करुन पोलीस आयुक्तांनी केले औपचारिक उद्घाटन

पुणे : मंडईतील म्हसोबा उत्सव पाहून पुण्याच्या गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यासारखे वाटत आहे. म्हसोबा उत्सवामागे अध्यात्मिक दृष्टीकोन तर आहेच, पण त्याला सामाजिक जोड देखील असल्याचे दिसून आले.

यामुळे सर्वांची तणावमुक्ती देखील होत आहे. कार्यकर्ते व भाविकांमधील उत्साह पाहून खूप प्रसन्न वाटत आहे, असे मत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित म्हसोबा उत्सवाचे औपचारिक उद्घाटन अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले. त्यांनी ढोल-ताशाचे वादन करून उद्घाटन केले.

यावेळी रांका ज्वेलर्सचे ओमप्रकाश रांका, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन संपूर्ण उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित उत्सवाचे औपचारिक उद्घाटन अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले. त्यांनी ढोल-ताशाचे वादन करून उद्घाटन केले.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित उत्सवाचे औपचारिक उद्घाटन अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले. त्यांनी ढोल-ताशाचे वादन करून उद्घाटन केले.

Spread the love