कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी :
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही २०१९ चा महाराष्ट्र केसरी व नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने विजयी घोडदौड दुसर्या फेरीतही कायम ठेवली. मुंबईच्या आकाश गुंडसोबत झालेल्या रोमहर्षक लढतीत सदगीरने २-१ अशी लढत जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. सुरुवातीला गुंडने ताकद पणाला लावत आपल्या खात्यात एक गुण मिळवला. मात्र मध्यंतरानंतर सदगीरने आक्रमक खेळ केला. सलग दोन गुण घेत सदगीरने विजयी बाजी मारली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समिती आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन भाजपाचे राज्य संघटक व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. हिंद केसरी रोहित पटेल,महाराष्ट्र केसरी अप्पा कदम, बापूसाहेब लोखंडे, सईद चाऊस, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पोलीस उपाधीक्षक विजय चौधरी आदीची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.







सदगीरप्रमाणेच गादी विभागात बुलढण्याच्या समीर शेख ने नाशिक शहराच्या कार्तिक गवई याला, तर वाशीमच्या वैभव माने याने परभणीच्या धनराज नवघरे याच्यावर विजय मिळवला. रत्नगीरीचा दादूमिया मुलाणी आणि पुणे जिल्ह्याच्या आकाश रानावडे यांच्यातील चुरशीच्या लढतीत मुलाणीने रानवडेला पराभूत केले. वर्धाचा संतोष जगताप गैरहजर राहिल्याने अक्षय मंगवडेने पुढील फेरीत प्रवेश केला. बीडच्या अक्षय शिंदे आणि मुंबईच्या अनिकेत मंगडे यांच्यातही जोरदार लढत झाली. अक्षयने उत्तम खेळ करत अनिकेतला पराभूत केले. पुण्याच्या तुषार दुबे आणि तुषार वरखंडे या दोन मल्लांमध्ये झालेल्या लढतीत दुबेने विजय मिळवला.पिंपरी चिंचवड च्या शेखर शिंदे ने औरंगाबादच्या मेघनाथ शिंदेला पराभूत केले.



माती विभागात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने नांदेडच्या अनिल जाधवला ५-० अशा फरकाने पराभूत केले. २०१९ चा उपमहाराष्ट्र केसरी व लातूरचा मल्ल शैलेश शेळके याने परभणीच्या राकेश देशमुखला धूळ चारली. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने एकतर्फी लढत देत आतिक शेख याचा १०-० असा दणदणीत पराभव केला.
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !