Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

महा मेट्रो पिंपरी स्टेशनच्या संगीता तरडे ब्रँड अँबेसिडर

पिंपरी, पुणे (दि. १० ऑगस्ट २०२२) पिंपरी चिंचवड महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या पिंपरी स्टेशन ब्रॅण्ड अँबेसिडर म्हणून आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांची निवड करण्यात आली आहे.

तसे निवडीचे पत्र संगीता तरडे यांना महा मेट्रोचे संचालक विनोद कुमार आगरवाल यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. यावेळी महा मेट्रोचे डीजीएम मनोजकुमार डैनिल उपस्थित होते.

संगीता तरडे ह्या मागील तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील महिलांसाठी महिला फोरमच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेउन महा मेट्रोने पिंपरी स्टेशनच्या ब्रॅण्ड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संचालक विनोद कुमार आगरवाल यांनी दिली.

महा मेट्रोच्या ब्रॅण्ड अँबेसिडर झालेल्या संगीता तरडे ह्या देशातील पहिल्या महिला असून पुणे मेट्रोचे काम सुरू झाल्या पासून पुणे मेट्रोची ओळख आणि त्याचा प्रसार होण्यासाठी संगीता तरडे यांनी अनेक वेळा महा मेट्रोच्या अनेक उपक्रमात सहभाग घेऊन हजारो महिलांचा सहभाग नोंदविला आहे.

ब्रॅड अम्बिस्टिरपदी महा मेट्रोने माझी नियुक्ती केली त्या बद्दल मी मनापासून आभारी आहे. महा मेट्रोचा प्रवास हा सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त असल्याने निश्चितच महा मेट्रो पिंपरी चिंचवड मधील नागरिकांच्या पसंतीला उतरेल. मेट्रो मुळे इंधन बचत, वेळेची बचत, प्रदूषणमुक्त प्रवास सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर व्हावा यासाठी मी प्रयत्नशील राहिल अशी प्रतिक्रिया संगीता तरडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
……………………………………….

Spread the love