Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

‘’माध्यम युवारत्न २०२२’’
तिवारी,खोरगडे,कराळे,मेहेंदळे यांना प्रदान.

नवरात्र २०२२ च्या निमित्ताने माध्यम क्षेत्रातील मधील ४ महिला युवा पत्रकारांना ‘‘माध्यम युवारत्न पुरस्कार २०२२’’ हे नुकत्याच झालेल्या एका समारंभात प्रदान करण्यत आले. सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे .

मधुमती स्नेह मंच,पुणेचे तालभूषण पं. नचिकेत मेहेंदळे आणि कीर्तनकार ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले .कीर्तनककलानिधी ह.भ.प.कै. अनंतबुवा मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ सन्मान‘ती’चा म्हणून पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षापासून अधिक कार्यरत असलेल्या पुण्यातील शिवानी खोरगडे (लोकमत –डिजिटल) ,नीलम कराळे (आय बी एन लोकमत –डिजिटल) तन्मयी मेहेंदळे(अक्षरकला मिडिया) ,श्रुती तिवारी (अक्षरकला मिडिया) , यांना नवरात्र २०२२ निमित्ताने प्रदान करण्यात आले. अशी माहिती मधुमती स्नेहमंच पुणेचे अध्यक्ष तालभूषण पं. नचिकेत मेहेंदळे यांनी दिली.

आपले स्नेहांकित,
नचिकेत मेहेंदळे.
(अध्यक्ष- मधुमती स्नेहमंच ,पुणे)
९८२२९१६६४६.

Spread the love