Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ॲड.प्रसन्नदादा जगताप मित्र परिवार व स्पर्श स्किन ईएनटी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ॲड.प्रसन्नदादा जगताप मित्र परिवार व स्पर्श स्किन ईएनटी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणे खुर्द येथील चव्हाण जगताप चौकातील प्रेस्टिज कॉर्नर मधील दुसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

या शिबिरात डॉ.चंद्रकांत पौळकर व डॉ.श्रद्धा पौळकर यांच्याकडून अल्प दरात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे सिंहगड रोड परिसरातील हिंगणे, सनसिटी रोड, माणिकबाग, विठ्ठलवाडी, पु.ल. देशपांडे उद्यान, नांदेड सिटी, लायगुडे हॉस्पिटल परिसरातील व इतर अनेक भागातील गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

ॲड. प्रसन्नदादा जगताप यांच्या वतीने मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही शिबिरांना नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ॲड. प्रसन्नदादा जगताप यांच्या समवेत राजाभाऊ कदम, किशोर कुलकर्णी, राहुल जोशी तसेच इतर अनेक मित्र मंडळी उपस्थित होते.

Spread the love