Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेनेची पहिली कुमक रवाना..

आज मा.मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त “कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम न करता पुरग्रस्तांना मदत करावी आणि आपल्या मराठी बांधवांचे अश्रु पुसावेत” असे आवाहन पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली असून अनेकजण बेपत्ता आहेत..

अचानक आलेल्या या अस्मानी संकटाचा सामना करताना इथल्या आपल्या बांधवाना भावनिक-मानसिक-आर्थिक-वैद्यकीय आधाराची गरज ओळखून चार डाॅ अॅम्ब्युलन्स, औषधोपचार वैद्यकीय साहित्य, प्रथमोपचार किट, सॅनिटरी नॅपकिन घेउन पहिली कुमक सांगली, सातारा, कोल्हापूर, येथे रवाना झाली.

या आपत्तीग्रस्त बांधवांचे अश्रु पुसण्यासाठी पुणेकरांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी असे आवाहन या प्रसंगी पुणे शहर शिवसेना प्रमुख मा.संजय मोरे यांनी केले.

या वैद्यकीय मदत पथकाचे नेतृत्व शिवसेना पुणे उपशहर प्रमुख डाॅ.अमोल देवळेकर हे करणार आहेत.

आगामी काळात मदत करणाऱ्या वेगवेगळ्या टिम रोज रवाना होणार आहेत या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी पुणे शहर शिवसेना कार्यालय किंवा होप हाॅस्पिटल नाना पेठ येथे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले..

या प्रसंगी कॅन्टोन्मेंट विभाग शिवसेना संपर्क प्रमुख मा.दिलीपराव तांबोळी,विधानसभा प्रमुख अभय वाघमारे,विभाग प्रमुख उत्तम भुजबळ,अनिल दामजी,
राजेश मोरे,राहूल जेटके यांचेसह युवा सेना पदाधिकारी सनी गवते,अक्षय फुलसूंदर,सत्यम सोनवणे तसेच इतर शिवसेना पदाधिकारी रमेश परदेशी,परवेश राव,नितिन दरेकर,अजय परदेशी,निलेश कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते..

आवश्यक वस्तू: कपडे,रेडी फूड,साबण,टूथपेस्ट,तेल, सॅनिटरी नॅपकिन,पिण्याचे पाणी,औषधे,ड्रेसिंगसाहित्य, रेन कोट,छत्री,टॉर्च इत्यादी.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love