Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

लतादीदींची निवडक गाणी, दीदींचा सहवास लाभलेल्या अभ्यासू जाणकार संवादक, सुरेल गायिका, मोजका वाद्यमेळ, जाणकार रसीक आंणि सरपोतदारी आदरातिथ्य

मैफल अविस्मरणीय व्हायला अजून काय हवे !
पुण्यनगरीमधे रोजच, कार्यक्रमांची रेलचेल असते पण event आणि आत्मीयतेचा सोहळा, यामधील वेगळेपण , जाणकार रसीकांनाच भावते ! पुना गेस्ट हाऊसवर, स्नेहमंचने सादर केलेल्या मै नही तो क्या या मैफलीत, नेमका हाच प्रत्यय आला.

सुलभा तेरणीकर यांच्याकडे जाणकारी बरोबर आठवणींचा खजीना आहे, मोजक्या शब्दांचे भान आहे, अभिनिवेश विरहित सादरीकरण सुद्धा मनाला भावते.
मनीषा निश्चल ही नव्या पिढीची गायिका, लतादीदींच्या गाण्यांचे शिवधनुष्य, विनम्रतेने सांभाळते.

संगीतातील बारकावे, लकेरी, अवघड वळणे यांची जाणीव तिला आहे, त्यामुळेच रसीकांची दाद तिला हमखास मिळते !
कौतुक करावे तितके थोडेच आहे. मेजवानी, पंचपक्वान्ने, सुग्रास असे शब्द थिटे पडावेत, अशा सुरेल पंगतीची अनुभूती आम्ही घेतली . . .

. . . तोच प्रत्यय सर्वांना यावा म्हणून हा शब्दांचा रियाज !

Spread the love