Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

क्रीडा भारतीचा ‘भारत प्रदक्षिणेद्वारे राष्ट्रवंदना’ उपक्रम

संपूर्ण देशात 225 ठिकाणी युवकांच्या दुचाकी रॅलीचा विक्रम

पुणे दि. २४ – क्रीडा भारतीच्या वतीने स्वराज्य ७५ निमित्ताने संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आलेली व भारतमातेची अभिनव अर्चना असणारी राष्ट्राची परिक्रमा २२ मे रोजी एकाच दिवशी व एकाच वेळी पार पडली. संपूर्ण देशात सुमारे 225 ठिकाणी युवकांची दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यात तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला, अशी माहिती क्रीडा भारतीच्या भारत प्रदक्षिणेतून राष्ट्र वंदना उपक्रमाचे संयोजक विजय पुरंदरे यांनी दिली.

▪️संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मे 2022 रोजी सकाळी 8.56 मिनिटांनी देशाच्या सर्व प्रांतातील 225 ठिकाणाहून भारतमातेची मूर्ती आणि राष्ट्रध्वज घेऊन रॅली निघाली. या राष्ट्र वंदनेमध्ये खेळाडू, कामगार, नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सुमारे 3 तासांच्या कालावधीत, 26,500 तरुण पुरुष आणि महिलांनी एकूण 18,000 किमी पेक्षा जास्त अंतर पार करत परिक्रमा पूर्ण केली. या सर्वांचा उत्साह आणि समर्पण कौतुकास्पद होता.

या संपूर्ण उपक्रमाला केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे पूर्ण सहकार्य होते. याबद्दल क्रीडा भारतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्रालयाचे अधिकारी, केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

▪️पुरंदरे म्हणाले, एकाच दिवशी व एकाच वेळी सांघिक स्वरूपात संपूर्ण राष्ट्राची प्रदक्षिणा करण्याची अद्भुत अनुभूती, तरुणांना राष्ट्रभावनेने प्रेरित करून नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा धाडसी शिस्तबद्ध उपक्रम, संपूर्ण देशात २४ तास देशभक्तीचे वातावरण, संपूर्ण देशातील जास्तीत जास्त गावे, शहरांपर्यंत खेळाच्या माध्यमातून राष्ट्राशी संबंधित प्रबोधन आणि ‘आनंदासाठी खेळ आणि खेळातून राष्ट्र निर्माण’ या संकल्पनेचा प्रसार करण्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी झालो.
तमिळनाडू व प. बंगालमध्ये अडथळ्याचा प्रयत्न झाला.

तर तमिळनाडूत परवानगी दिल्यानंतरही राज्य प्रशासन आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी तिरंगा आणि भारत मातेच्या पुतळ्यासह पूर्ण शिस्तीत चाललेली प्रदक्षिणा थांबवली. सहभागी नागरिकांना आणि क्रीडा भारतीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या या वागणुकीने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य आणखी उंचावले. कोलकत्यात प्रशासन आणि पोलिसांनी रॅलीला परवानगी देणार नाही, अशी भूमिका घेत विरोध केला. परंतु स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आपल्या स्कूटर व बाईकसह कार्यक्रमस्थळी पोहोचले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कोलकाता येथे भव्य रॅली काढण्यात आली. प्रशासनाच्या या भूमिकेविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची स्थानिक नागरिकांची स्वाभाविक प्रतिक्रिया हीच आपली प्रेरणा आणि आपल्या देशाची ताकद आहे.

Spread the love