Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधी चे नांव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान व मोदी सरकारच्या कोत्या मानसिकतेचेच दर्शन

‘सर्व पक्षीय नेत्यांची’ कडवट टीका..


पुणे दि ९ – दिवंगत पंतप्रधान व राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान.. असून, लोकशाही संसदीय पध्दत मुल्ये पायदळी तुडवली गेली..

देशास शरम वाटावी असे कृत्य मोदी सरकार कडून घडले आहे.. यास काळ ही माफ करणार नाही.. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले..

राजीव गांधी स्मारक समितीचे वतीने खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधी चे नांव काढणारी ‘निंदनीय कृती’ मोदी सरकारने केल्याचा निषेध’पर धरणे कार्यक्रमात बोलतांना केले..

समिती संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक भाषण केले.. स्व राजीवजींच्या संगणक व मोबाईल क्रांतीमुळेच कोरोना काळात देश तरला व ‘वर्क फ्रॅाम होम’ होऊ शकले, परंतू त्यांचे नांवे पुर्वीच्या काँग्रेस सरकार काळात (भाजप सहीत एकमताने) सुरू केलेला राष्ट्रीय पुरस्कार मात्र मोदी सरकारने रद्द करून कृतध्नतेची पावतीच दिली असे देखील गोपाळ तिवारी म्हंटले..!

मा महापौर ॲड अंकूश काकडे यांनी मनपात देखील एखादे नाव गल्ली, बोळ वा चौक, रस्त्यास दिल्यावर ते बदलण्याचा प्रघात नसल्याचे सांगीतले..

काँग्रेस नेते श्रीरंग चव्हाण पाटील यांनी मोदी सरकारच्या मानसिकतेचेच हे दर्शन असल्याचे सांगितले..

शिवसेनेचे संपर्क प्रमूख गजानन थरकूडे यांनी मोदींच्या राष्ट्रीय नेतृत्वाप्रती अनादर व आकस स्पष्ट करणाऱ्या ‘निंद्य कृतीचा’ शिवसेने तर्फे निषेध केला..

श्री रविंद्र माळवदकर यांनी मेजर ध्यानचंद यांचे नावे स्वतंत्र बजेट उभारून अधिक महत्वपुर्ण पुरस्कार देऊ शकले असते? पण मोदींच्या अहंभावी स्वभावाने मेजर ध्यानचंद पुरस्कार वादातीत करण्याचे पाप भाजप ने केले असल्याचे सांगितले.

विरोधीपक्ष नेत्या सौ दिपाली धूमाळ, सौ मृणालीनी वाणी, श्री बाबा खान, श्री निरंजन कुलकर्णी, सौ अर्चना शहा, भारत इनमुले, हमाल पंचायत व रिक्षा पंचायत श्री बाबा आढाव, नितीन पवार यांनी निषेध आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला..

त्यांचे वतीने श्री ओंकार पवार यांनी मनोगत व्यक्त केले.. श्री श्रीकांत जी शिरोळे, आभार पुणे शहर काँग्रेस चे ऊपाध्यक्ष श्री सुर्यकांत मारणे यांनी मानले….

निषेधाचे फलक, आजपर्यंत दिले गेलेले राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची यादी व स्व राजीवजींचे क्रीडा व विकासातील योगदान विषयी माहीती चे फलक राजीव गांधी स्मारक समिती तर्फे लावण्यात आले होते..

भर उन्हात सु २ तास निषेध आंदोलन चालले होते.. अभिनव शिक्षण संस्थेचे श्री राजीव जगताप, सुभाष थोरवे, आबा तरवडे, रामचंद्र (भाऊ) शेडगे, भूषण रानभरे, पै. दशरथ पवार, संजय अभंग, धनश्याम निम्हण, सुभाष जेधे, विश्वास दिघे, भोला वांजळे, आबा जगताप, रमेश सोनकांबळे, महेश अंबिके, किशोर मारणे, राजू नाणेकर, सुरेश ऊकीरंडे, अशोक काळे, पै शंकर शिर्के, बाळूशेठ ओझा, शशिकांत बिबवे, ॲड सचिन अडसूळ, गणेश गोकूळे, गोरख भालेकर, सिध्दार्थ शिंदे, अप्पा बने, राहूल मते, बाबा चोकसे, आशिश गुंजाळ, अजय अनिवसे, गणेश कूरे, देवराज इंदूलकर, संजय कुरकुटे इ या ‘निषेध आंदोलनात’ राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य व काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने ऊपस्थित होते..

राष्ट्रगीत होऊन निषेध धरणे आंदोलनाची सांगता झाली.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343

Spread the love