Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

‘कार्त दे विझीत’ चित्रप्रदर्शनातून उलगडणार विविध देशांतील नामवंतांच्या अद्भूत कथा

चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांचे प्रदर्शन ; देश-विदेशातील नामवंत व्यक्तींच्या १२० पोटेट्सचे प्रदर्शन

पुणे : चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांचे ‘कार्त दे विझीत’ या पोट्रेट चित्रप्रदर्शनाचे आयोजन दिनांक १० ते १२ जून दरम्यान पुण्यात करण्यात आले आहे. भांडारकर इन्स्टिटयूट रस्त्यावरील आर्ट टू डे आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. चारकोल पेपरवरील पोट्रेट चित्रांचे हे प्रदर्शन असल्याची माहिती प्रदर्शनाच्या आयोजक व चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांनी दिली.

 
संघर्षपूर्ण जीवनातून सर्वोच्च गोष्टी साध्य केलेल्या विविध देशातील तेजस्वी मनांचा, धाडसी माणसांचा आणि प्रभावी व्यक्तीमत्त्वांचा उत्सवच  सहस्रबुद्धे  यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून साजरा केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, रविंद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ईरफान खान, सचिन तेंडूलकर, कपिल देव, मधुबाला, श्रीदेवी, ओप्रा विन्फ्रे यांसारख्या देश -विदेशातील अनेक नामवंतांची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

प्रदर्शनात १२० चित्रे मांडण्यात येणार असून प्रेरणादायी व्यक्तिमत्व चित्राद्वांरे पुणेकरांना पाहता येणार आहेत. शुभदा सहस्रबुद्धे या २३ वर्षे अमेरिकेमध्ये होत्या. सध्या त्या पुण्यामध्ये पद्मावती येथे वास्त्यव्याला आहेत. अमेरिकेमध्ये असताना त्यांनी ही सर्व चित्रे साकारली आहेत.

 
कोरोनाच्या आव्हानात्मक काळात शुभदा सहस्रबुद्धे यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून सकारात्मकता पसरविण्याचा निर्धार केला. भूतकाळातील आणि सध्याच्या काळातील अशाच काही प्रभावी व्यक्तिमत्त्वांचे कलात्मक प्रतिबिंब साकारण्याचे काम त्यांनी ‘स्केच अ डे’ या  संकल्पनेतून सुरू केले. सलग १४० दिवस त्यांनी विविध देशातील प्रभावी व्यक्तीमत्त्वाचे चित्र काढले. या संकल्पनेतून केवळ सकारात्मकतेचा प्रसारच झाला नाही, तर जगभरातील लोकांशी जोडले गेले, असे त्या सांगतात.

 
शुभदा सहस्रबुद्धे यांनी प्रत्येक पोर्ट्रेटसाठी अडीच तासांची मुदत देत वेळेसह स्वत: ला आव्हान दिले. या प्रक्रियेत चेह -याच्या शरीररचनेचे बारीकसारीक बारकावे, आकार, चेह-यावरील भाव, प्रत्येक स्नायू लोकांच्या स्मितहास्यात कशी भूमिका बजावते, केस आणि त्वचेची पोत, वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांच्या चेह-याची रचना याचा अभ्यास केला.

शुभदा सहस्रबुद्धे म्हणाल्या, हे एक कलात्मक संशोधन होते. डोळे, नाक, कान, ओठ इ. प्रत्येकाची वैशिष्ट्ये सारखीच असतात, परंतु बारीकसारीक बदलामुळे चेह-याची ओळख पूर्णपणे बदलते. माझ्यासाठी चेह-यावरचे भाव हे सर्वोच्च प्राधान्य होते. पोर्ट्रेटला कलारसिकांशी संपर्क साधण्याची गरज आहे जेणेकरुन ते संभाषण करीत आहेत. हे जादूने कसे कार्य करते, हे प्रदर्शनात पहायला मिळेल. आॅटिझम रिसर्च अ‍ँड टेÑनिंग सेंटरमधील मुले, पालक, शिक्षक, विश्वस्त हे देखील या प्रदर्शनाला भेट देणार आहेत.

Spread the love