Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

कपिल देव उलगडणार जिवणप्रवास , पुण्याच्या महिला उद्योजिका लवळे गावचा कायापालट करणार

पुणे दिनांक — महिला उद्योजीकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वताच्या जिवनातील जडणघडण अनुभव तसेच महत्वाचे किस्से व टीम मंजमेंट ,संघटन कौशल्य आदी माहिती आणि आठवणी व्यक्त करीत फिक्की, महिला विंग, आयोजित कार्यक्रमात स्वतःचा जिवनप्रवास क्रिकेट पट्टु कपिल देव उलगडणार आहे. फिक्की महिला विंग (FLO) आयोजित महिलांना उद्योग व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी उदया एका परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमास कपिल देव पमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

फिक्की पुणे हि उदयोजकांची शिखर संस्था आहे. या संस्थेची (FLO) महिला विंग ही एक आघाडी आहे. नुकतेच ७ एप्रिल रोजी महिला विंग (FLO) पुणेच्या अध्यक्षपदी प्रसिध्द उद्योजीका निलम सेवलेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्या निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निलम सेवलेकर या उद्योजक व्यवसाया बरोबरच , सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनिय कार्य आहे. त्या पुण्याचे लोकप्रिय महापौर बाबूराव सणस यांची नात असून बाळासाहेब सणस यांच्या कन्या आहेत.

सेवलेकर यांनी येत्या वर्षभरात पुण्यातील फिक्कीच्या महिला उद्योजकांची संख्या मोठया प्रमाणात वाढविण्याचा संकल्प केला आहे. महिला उद्योजीका घडवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम उद्योग मार्गदर्शन शिबीर, परिषदा, व मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करून महिला उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आणी संधी निर्माण करण्यार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचाच एक भाग म्हणून उदया आंतरराष्ट्रीय किकेटपटटु कपिल देव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या वेळी 1983 साली भारताने पहिल्यांदा विश्वकप जिंकला होता त्याच्या दुर्मिळ आठवणी ही कपिल देव यावेळी महिलांना सांगणार आहे .या कार्यक्रमाने महीला उद्योजकांना नवी उमेद ,आशा आणि प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा सेवळेकर यांनी यावेळी व्यक्त केली .

या पत्रकार परिषदेस महिला विंग अध्यक्षा (FLO) निलम सेवलेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष रेखा मगर, उपाध्यक्षा पिंकी राजपाल, खजिनदार सोनिया राव, सहखजिनदार पुनम खोच्चर सचिव अनिता अग्रवाल, सहसचिव सुजाता सबनिस, उषा पुनावाला यांच्या सह पुणे शहरातील फिक्की (FLO) च्या प्रमुख पदाधिकारी व उद्योजिका उपस्थित होत्या.

पुण्याच्या महिला उद्योजिका लवळे गावचा कायापालट करणार

-लवळे गावाला महाराष्ट्रातील स्वयंपूर्ण व आदर्शगाव निर्माण करण्याचा-
महिला उद्योजकांनी केला संकल्प

पुणे दिनांक– पुणे जिल्ह्यातील लवळे या गावाचा रस्ते आरोग्य सेवा, आरोग्य शिबीर, मुलांसाठी गुरुकुल स्कुल, बचत बँक, सुविधा स्वच्छता गृह. घरांची निर्मीती व पुर्नबांधणीसाठी सहकार्य, स्वच्छता, कचरा निमुर्लन प्रकल्प उद्योग व्यवसाय व लघु उद्योजक निर्माण करण्यासाठी महिला व युवकांना विषेश प्रशिक्षण अशा विविध प्रकारच्या सेवा सुविधा निर्माण करून लवळे गावाला महाराष्ट्रातील सर्व सोयी सुविधा युक्त नं. १ गाव आदर्श रोल मॉडेल असे गांव करण्याचा संकल्प पुण्यातील महीला उद्योजकांनी केला असल्याचे फिक्की (FLO) पुणेच्या अध्यक्ष निलम सेवलेकर यांनी सांगितले.

या उपक्रमाचे उत्घाटन व भुमिपुजन समारंभ येत्या २२ एप्रिल रोजी लवळे येथे होणार आहे. या समारंभास विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुश प्रसाद, उपवनसंरक्षक राहूल पाटील तसेच मुळशी तहसिलदार अभय चव्हाण, सरपंच निलेश गावडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष निलमताई सेवलेकर व अनिरूध्द सेवलेकर असणार आहेत.

Spread the love