Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

जुन्नरच्या बौद्ध लेण्यांचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करा : खासदार गिरीश बापट

पुणे ता.४ : भारतातल्या सर्वात मोठ्या बौद्ध लेण्यांचा समूह असलेल्या जुन्नरचा जागतिक पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास करण्यासाठी भरीव विकास निधी द्यावा अशी मागणी संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष,खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय संस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांची आज दिल्ली येथे भेट घेऊन त्यांच्याकडे केली.

या भेटीत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना जुन्नर भेटीचे निमंत्रण दिले. यावेळी त्यांच्या सोबत या विषयात काम करणारे भाजप पुणेचे चिटणीस सुनील माने, डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे उपस्थित होते.

 

केंद्रीय पर्यटन मंत्र्यांच्या भेटीबाबत बोलताना खासदार बापट म्हणाले, पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर आणि परिसराला सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास आहे. सातवाहन काळातील ग्रीक आणि रोमन साम्राज्याची राजधानी म्हणून या परिसर ओळखला जात होता.

डेक्कन कॉलेजच्या उत्खननातून हे सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे नाणेघाट ते पैठण हा सातवाहनकालीन व्यापारी मार्ग होता. या इतिहासाच्या खुणा याठिकाणी आजही आढळतात. हा इतिहास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे.
या परिसरातील लेण्यांचा समूह आणि नाणेघाट हा केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने, या परिसराच्या विकासासाठी केंद्र सरकारने विकास आराखडा बनवावा यासाठी प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी यांची भेट घेऊन पत्र दिले.

केवळ पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशात ही लेणी सर्वात मोठी असल्याने देशव्यापी म्हणून याकडे पाहण्याची गरज आहे. बौद्ध धर्माला मोठी परंपरा असल्याने निधी उपलब्ध करून लेण्यांचा विकास केल्यास बौद्ध धर्माच्या अभ्यासकांसाठी याची उपयुक्तता वाढेल. त्याचप्रमाणे या लेणी समूहाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास देशाच्या पर्यटन विकासामध्ये मोठी भर पडेल.

मात्र अद्याप या लेणी समूहाकडे या दृष्टीने कोणी लक्ष न दिल्या सुनील माने यांनी डेक्कन कॅालेजचे माजी कुलगुरू आणि प्रख्यात पुरतत्त्व शास्त्रज्ञ डॅा. वसंत शिंदे यांच्याशी याबाबत झालेल्या चर्चेनंतर या विषयावर काम करण्याचा निर्णय घेतला.

त्याबाबत ज्येष्ठ नेते खासदार गिरीशजी बापट यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे या विभागाची जबाबदारी असल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून याकडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचवले.

त्याप्रमाणे त्यांनी सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांना देशव्यापी प्रकल्प म्हणून हातात घेण्याचा विनंती केली.
या भेटीत खासदार बापट यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत असून, त्यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला आमचा ऊर्जास्रोत आहे.

या किल्ल्याच्या विकासासाठी देखील निधीची मागणी केली असून, किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीमधील प्रस्तावित सातवाहनकालीन वारसा संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी केल्याचे देखील सांगितले.

जाहिरात / प्रसिद्धिसाठी
 संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
 संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप ✒️
✍️ पत्रकार – छायाचित्रकार 
 9422306342 / 8087990343

Spread the love