वन विभाग, महाराष्ट्र शासन व संस्कृती फाउंडेशन यांच्या वतीने हरित वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन

‘पाणी राणी’ ने पटकावला प्रथम क्रमांक
पुणे / प्रतिनीधी : माणसाने पर्यावरणाची अपरिमित हानी केली त्यामुळे माणसाला अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. जंगलतोड केली, त्यामुळे प्राणी शहरात आले. त्यामुळे जंगलावर होणारं अतिक्रमण थांबवून पर्यावरणाच्या प्रश्नांकडे अभ्यासूपणे पहा, असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी दिला.


वन विभाग, महाराष्ट्र शासन व संस्कृती फाऊंडेशन यांच्या वतीने हरित वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे बक्षीस वितरण आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ बुधाजिराव मुळीक, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, फिल्म हे खूप ताकदवान माध्यम आहे. फिल्म सारख्या डिजिटल माध्यमातून चांगल्या गोष्टी मुलांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. नव्या पिढीला पर्यावरणाच्या समस्या समजल्या तरच त्यावर ते जागरूकपणे काम करू शकतात.
तत्पूर्वी, महोत्सवाचे उद्घाटन भारतीय फिल्म अँड टेलव्हिजन इन्स्टिट्यूटचे विभाग प्रमुख प्रा. मिलिंद दामले व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे आयुक्त डॉ. एस. एच. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य वनसंरक्षक (नि) अरविंद आपटे, प्रा. डॉ. प्राची क्षीरसागर, नगरसेवक प्रसन्न जगताप, धायरीच्या माजी सरपंच आशा बेनकर, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, नांदेड सिटी डेव्हलपमेंटचे माजी संचालक अतुल कारले, वनजीव सल्लागार मंडळाचे सदस्य अनुज खरे, सोनाली पुंडे-रुपलग, वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक पवार, स्मिता खरमाळे, सुमित बेनकर, संस्कृती फाऊंडेशनचे सचिव महेश घोलप, सनी खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार सहाय्यक वनसंरक्षक रामदास पुजारी यांनी केले.
लघुपटात ‘पाणी राणी’ सर्वोत्तम

महोत्सवात पाहिले पारितोषिक सुमित पाटील, मुंबई यांच्या ‘पाणी राणी’ या लघुपटाला मिळाले. दुसरे स्थान अक्षय सुतार यांच्या ‘स्लोगन’ लघुपटाला तर तिसरे स्थान रवींद्र मठाधिकारी यांच्या ‘ए टेररिस्ट’ लघुपटाला मिळाले. प्रथम तीन लघुपटाला रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. कहाणी कुदरत की काठी की, नोटडाऊन व मांजा या तीन लघुपटला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

महोत्सवासाठी भारतीय फिल्म अँड टेलव्हिजन इन्स्टिट्यूटचे विभाग प्रमुख प्रा. मिलिंद दामले यांनी लघुपटाचे परीक्षण केले. या महोत्सवात देशातील ५८ लघुपट सहभागी झाले होते. त्यापैकी २६ लघुपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले.
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !