Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

जांभळे गावचे माजी सरपंच कै.तबाजी सबाजी गवांदे यांना जांभळे येथे साश्रु नयनांनी दिला शेवटचा निरोप

जांभळे,ता.अकोले,जि. अहमदनगर
दि.०४.०९.२०२२

त्यांच्या दशक्रिया विधी निमित्त डोंबिवली (मुंबई ) येथील ह.भ.प. प्रवचनकार अश्विनीताई म्हात्रे यांच्या प्रवचन सेवेने झाला समारोप, कै.तबाजी दादा यांच्या दशक्रिया विधी निमित्त अकोले,संगमनेर, नगर, पुणे, मुंबई परिसरातील हजारो आप्तेष्ट, नातेवाईक, आवर्जून दादांना निरोप देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी हजर होते.

यामध्ये बजरंग दलाचे शंकरराव गायकर, अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक बी.जी. देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गणपतराव महाले, निवेदक भाऊसाहेब कोकाटे, रेश्मा गोडसे, ह भ प हिराबाई शेवलीकर, गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ साहेब, बाबुराव गवांदेसर, सिताराम देशमुख, भाऊसाहेब रकटे, ह. भ. प. किसन महाराज मातेले, यशोमंदिर पतसंस्थेचे बी.जी. गायकर,भानुदास आरोटे, बी. आर. आरोटे, आप्पासाहेब शिंदे, सिताराम भांगरे ,रमेश शिंगोटे इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

सर्वांनी दादांच्या कार्यकालाचा आढावा घेताना, त्यांच्या कार्यकर्तुत्वाचे कौतुक केले तसेच मुलांना मोठे होण्यात त्यांना कर्तुत्वान बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो, आई-वडिलांचे संस्कार हे मुलांच्या मोठे होण्यात कामी येतात, हे त्यांच्या दशक्रिया विधीला उपस्थितीत जनसमुदायाने अधोरेखीत केले,ह.भ.प. अश्विनीताई म्हात्रे यांनी उपस्थित जनसमुदायाचे प्रबोधन करताना सांगितले की, मुले फक्त शिकली, श्रीमंत झाली तर समाज घडतो,असे नाही तर ती सुसंस्काराने घडली तरच ती आई वडिलांची सेवा करतात,आणि सुसंस्कृत व निर्व्यसनी तरुणांची पिढी हीच खरी देशाची संपत्ती आहे,असं त्यांनी सांगितले.

अनेक मान्यवरांनी कै.दादा यांना असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातील त्यांचा नामोल्लेख आवर्जून केला, त्यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती, शर्यतीसाठी योग्य लागणारा चपळ बैल निवडण्याची त्यांना अतिशय पारख होती.

यशोमंदिर सहकारी पतपेढी चे माजी संचालक दिनेशचंद्र हुलवळे यांनी कै. तबाजी गववांदे यांच्या परिवाराचा धावता आढावा घेऊन त्यांच्या कालखंडात झालेल्या कामांची माहिती दिली, सूत्रसंचालन सचिन गवांदेसर ,पसायदान अजित महाराज दिघे यांनी तर,

आभार कै.तबाजी सबाजी यांचे जेष्ठ चिरंजीव अहमदनगर जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष, राज गव्हांदेसर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे दबदबलेल्या, पाणवलेल्या नयनांनी सर्वांचे आभार मानले, आभार व्यक्त करांना करताना वडिलांच्या कर्तृत्वाचा उमटलेल्या ठसा पाहताना सरांना आनंद अश्रू आवरत नव्हते, गवांदे सरांचा उच्चविभूषित परिवार कुटुंब, आप्तेष्ट, नातेवाईक व मित्र परिवाराचा मोठा संच असल्याचे अनेक मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजली सभेततील मनोगतात व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, छत्रपती न्यूज इंडिया, पुणे

Spread the love