Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

जांभळे गावचे ज्येष्ठ नागरिक पै.कै.विश्राम नारायण हुलवळे यांचे नुकतेच 15 जुलै 2023 रोजी वृद्धपकाळामुळे निधन

छत्रपती न्यूज इंडिया, लालमहाल महोत्सव समिती, व शिवप्रभू फाउंडेशन तर्फे कै.विश्राम बाबांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली!

विश्रामबाबांच्या मागे पत्नी श्रीमती यमुनाबाई,व यशोमंदिर सहकारी पतपेढीचे संचालक, मुंबई व व्यवसायीक चि.श्री.चंद्रकांत विश्राम हुलवळे यांचे ते वडील होते.

विश्राम बाबांना दोन मुलगे तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

त्यातील सूर्यकांत हे मर्चंट नेव्ही मध्ये इंजिनियरिंग पदावर कार्यरत असताना काही वर्षांपूर्वीच दिवंगत झाले.
कै. हौसाबाई नारायण हुलवळे,
कै.नारायण लक्ष्मण हुलवळे
यांच्या पोटी एकुलता एक मुलगा कै. विश्राम नारायण हुलवळे होता,
जन्म मु.जांभळे,ता.अकोले, जि.अहमदनगर या छोट्याशा गांवी शेतकरी कुटुंबात झाला.

शालेय शिक्षण ७ वी पर्यंत ओतूर येथे घेत असताना विश्रामबाबा खुप आजारी पडले, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आजी (हौसाबाई) तळेगांव (पुणे) येथे दादांना घेऊन स्थलांतरित झाली.

मुलगा बरा झाल्यावर त्यास घेऊन मुंबई येथे डोंगरी भागात भाजी व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

पुढे नारायणबाबा ‘पोट्रस’ मध्ये काम करू लागले,
डोंगरी येथे भाड्याने खोली घेऊन स्थायिक झाले.

आजारातून बाहेर आल्यावर दादांनी (विश्राम बाबा) स्वतःकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे ठरविले व शरीर सुदृढ करायचेच म्हणून खूप मेहनत करू लागले,त्यातच त्यांना तालमीचा,कुस्तीचा छंद लागला,पुढे स्वतःचा कोंबडी आणि अंडी विकण्याचा व्यवसाय उभा केला.

विश्रामबाबा यांचा व्यवसायात जम बसल्यानंतर हौसाबाई व नारायणबाबा हे दोन्ही शेतीसाठी करण्यासाठी गावी (जांभळे) आले.

विश्रामबाबांनी एक नियम केला आयुष्यात कोणतेही व्यसन करायचे नाही.

अगदी तंबाखू सुद्धा खायची नाही,
त्यांना एकच व्यसन म्हणजे चांगलं खायचं, व आपले शरीर चांगले कमवायचे व कोणत्याही डॉक्टर कडून कधीच औषध घ्यायचे नाही.

रोज दोन लिटर दूध,अंडी, बदाम,भरपूर फळे खाणे हा त्यांचा नित्यक्रम असे.

घरातही तशीच सर्व मुलांना शिस्तबद्ध वागणूक त्यांनी दिली.

अगदी घरात चहा सुद्धा केला जात नसे.
कोणी पाहुणे आले तरी त्यांना दूधच मिळत असे.

आईला कधी वाटलं वडिलांच्या नकळत नसताना ती चोरून चहा पीत असे.

अखंड आयुष्यभर ज्ञानेश्वरी पठण नित्यनेमाने करत होते.

पोथी नियमित वाचन करीत असत,श्रावण महिनाभर पारायणे व संध्याकाळची रोज पोथी वाचणे हा नेहमीचा नित्यनियम होता.

त्यांचा मुलांसाठी संस्कार म्हणजे शिक्षणासाठी वाटेल तेवढा खर्च झाला तरी चालेल,पण मुले,मुलीनी शिक्षण घेतले पाहिजे. त्याकाळी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले

दुसरा म्हणजे चांगलं,
चांगुलं खाण्यावर खूप भर असायचा.

त्यांच्या शिस्तबद्ध वागणुकीमुळे स्थानिक भागत आदरयुक्त दरारा होता.

दोन्ही मुलं व्यवस्थित शैक्षणिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या मार्गी लागल्यावर ३५ वर्ष व्यवसाय करून विश्रामबाबा आई-वडिलांचे सेवेसाठी गावी आले.

गांवी येऊनही त्यांनी किमान दीड हजार फळझाडे जगवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला.
गोपालन करुन दूध व्यवसाय व किराणा मालाचे दुकान ही चालवले.

गांवीही त्यांनी आपला पोहणे, व्यायाम करणे, कुस्ती करणे, गावातील मुलांना कुस्तीचे धडे देणे, हा छंद ते सतत जोपासत होते.

त्यांच्या मागे
दोन मुलगे तीन मुली व नातवंडे नातजावई असा परिवार आहे.

प्रथम मुलगी
सौ.लक्ष्मी दादाराम पारखे.
श्री.दादाराव किसन पारखे
सौ क्षितिजा (अमेरिका स्थायिक)

द्वितीय मुलगा
चंद्रकांत विश्राम हुलवळे
BFA, interior designer
जेजे स्कूल ऑफ आर्ट
विलासीनी चंद्रकांत हुलवळे
Principal 27 year English medium school teacher

जान्हवी सुजित घुले (विवाहित)
Master of architecture
तन्वी चंद्रकांत हुलवळे
Master of Mechanic enginner (Germany)

तिसरा मुलगा
कै.सुर्यकांत विश्राम हुलवळे
Merchant Navy engineering
श्रद्धा सूर्यकांत हुलवळे
Graduate
मंथन सूर्यकांत हुलवळे
Civil engineering
निलाजंन सूर्यकांत हुलवळे
शिक्षण घेत आहे.

चौथी मुलगी
मीरा सुधाकर दरंदाळे
Bsc
सुधाकर बबन दरंदाळे
श्रुती degital photography
क्रिश शिक्षण चालू आहे

पाचवी मुलगी
अर्चना अनिल भोर
Home science

भौमिक फुटबॉल पारंगत
नॅशनल टीममध्ये
——— ●शोकाकुल●——-

चंद्रकांत विश्राम हुलवळे,
विलासीनी चंद्रकांत हुलवळे,
श्रद्धा सुर्यकांत हुलवळे,
लक्ष्मी दादाराव पारखे,
मीरा सुधाकर दरंदाळे,
अर्चना अनिल भोर,

दादाराव किसन पारखे,
सुजित शांताराम घुले,

क्षितिजा,जान्हवी,तन्वी,
मंथन,निलाजंन,भौमिक,

श्रृती,क्रिश

समस्त हुलवळे व गवांदे परिवार,जांभळे

Spread the love