Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

जगातील पहिला व शाहू महाराजांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या साक्षीने ३४८ वा शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा…

जगातील पहिला व शाहू महाराजांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या साक्षीने ३४८ वा शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी AISSMS चे विद्यमान SECRETARY युवराज छत्रपती मालोजीराजे भोसले, विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदयजी सामंत व संयोजक अमित गायकवाड उपस्थित होते.

तसेच College Of Engineering, Pune या संस्थेत सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शिवचरित्र व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या रोमांचकारी व्याख्यानाने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात झाला.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदयजी सामंत, पुणे शहराचे खासदार गिरीशजी बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे इ. मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती मिडिया ग्रुप ✍️  शिवाजी मा. हुलवळे  9422306342

Spread the love