Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सुवर्णजडीत मंदीर निर्मितीसाठी खुल्या हृदयाने दान करावेः खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन

श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट

पुणे, दिः१८, सप्टेंबरः जगतगुरू संत श्री तुकाराम महाराज यांचे भंडारा डोंगरवर सुवर्णजडीत मंदीर निर्मितीसाठी १-१ रूपया जमा करू. आजच्या या संकल्पाला कल्प वृक्षात बदलू. त्यासाठी समस्त वारकरी, भाविक भक्त आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी खुल्या हृदयाने दान करण्याचे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट, मावळ, जि. पुणेचे यांच्यावतीने भंडारा डोंगर येथे जवळपास १५० कोटी रूपये खर्च करून सुवर्णजडित मंंदिराची निर्मिती करण्याचे कार्य सुरू झाले आहे. यासाठी लागणार्‍या निधी संकलनासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट, अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी केलेल्या आवाहानानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनी १ महिन्याची १ लाख ११ हजार रूपये पेन्शन दिली. तसेच विविध शैक्षणिक संस्थांनी एक दिवसाचे वेतन, कारखानदार, उद्योगपती, भाविक भक्तांनी आपल्या यथाशक्ती नुसार दान राशीचे चेक दिले.

तसेच, डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी स्व.उर्मिला कराड यांच्या सोन्याचे १०० तोळे दागिणे आणि संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या एक दिवसाचे वेतन दिले. त्याच प्रमाणे समाजातील अन्य दानशुर व्यक्तिंनी यथाशक्ती दान दिले आहे.

यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, शांती ब्रह्म मारूतीबाबा कुर्‍हेकर, माजी खासदार नानासाहेब नवले, माजी मंत्री कमलकिशोर कदम, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, बापूसाहेब मोरे, समाजसेवक उल्हासदादा पवार, मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्र कराड नागरे, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, मदनमहाराज गोसावी, आळंदी देवस्थानाचो डॉ. अभय टिळक, आमदार सुनील शेळके, बाळा भेगडे, कृष्णराव भेगडे, डॉ.यू.म.पठाण, नितीन महाराज मोरे, राहुल कलाटे, बापूसाहेब देहूकर, संजोग वाघेरे, बाळासाहेब काशीद, भाऊसाहेब भेगडे यांच्यासह अनेक भक्तगण मोठया संख्येत उपस्थित होते.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, मंदिराच्या कार्याला योग्य दिशा देण्यासाठी आणि उभारणीसाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. मावळची भूमी ही भक्ती शक्तीची परंपरा असणारी आहे. येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना अभंग सुचले. तुकोबारायांचे चिंतनस्थळ असणार्‍या भंडारा डोंगरावर साकारलेले मंदिर जगाला प्रेरणा देईल.येथे मुख्यमंत्री, खासदार, भाविक भक्त, शेतकरी, प्रतिनिधी यांनी भेटे देऊन आपला सहयोग दयावा.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मंदिर निर्मितीचा संकल्प घेऊन जे कार्य सुरू केले आहे. त्याला प्रत्येकांनी हातभार लावला. येथे उभारण्यात येणार्‍या भव्य शिल्पामुळे जगद्गुरूंचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचण्याचे कार्य लवकर होईल.

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ज्ञानाचे तीर्थ क्षेत्र म्हणून हे उदयास येणार आहे. स्वामी विवेकानंद म्हणत असे की आपले हात हे घेण्यासाठी नाही देण्यासाठी सुध्दा असतात. याच न्यायानुसार उदार अंतःकरणाने मदत करून आपल्या घराण्याच्या नावलौकिकात व वैभवात भर पाडा. या सुवर्णजडित मंदिराच्या माध्यमातून भारताच्या वैभवात भर पडेल. याच अर्थाने भारत विश्वगुरू म्हणून संपूर्ण जगासमोर उदयास येईल.

उल्हास पवार म्हणाले, गाथेच्या जन्मभूमीत मंदिर उभारले जात आहे, हा सुवर्ण पर्वत आहे. येथील मंदिर सुवर्णमय करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे.
या प्रसंगी नानासाहेब नवले व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी आपले मनोगत मांडून जनतेस आवाहन केले.
प्रास्ताविक बाळासाहेब काशिद यांनी केले.
बापूसाहेब भेगडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Spread the love