Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

दुर्बिणीद्वारे कानांच्या शस्त्रक्रियेवरील आंतरराष्ट्रीय SEOCON परिषदेचे
दि. 1 ते 3 सप्टेंबर 2023 रोजी आयोजन.

पिंपरी – डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी पुणे व सुश्रुत ई एन टी हॉस्पिटल तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्बिणीतून कानांच्या शस्त्रक्रियेवरील आंतरराष्ट्रीय SEOCON परिषद येत्या शुक्रवारी दि. 1 ते 3 सप्टेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले असून यामध्ये दुर्बिणीद्वारे कानांच्या शस्त्रक्रियेसाठी विविध नाविन्यपूर्ण तंत्राचा वापर यावेळी करण्यात येणार आहे.

या परिषदेत कानाच्या विविध शस्त्रक्रिया या पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयातून थेट प्रक्षेपणाद्वारे वडगाव मावळ येथील हॉटेल ओर्रिटेल येथे तज्ञ् सहभागार्थीना दाखविण्यात येतील.

दुर्बिणीद्वारे कानांच्या शस्त्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवनवीन तंत्राबरोबर शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण देणे व या शस्त्रक्रियांचे मूल्यमापनात्मक अभ्यास करणे हा प्रमुख उद्देश आहे

या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी इटली, मलेशिया, अमेरिका येथून सुप्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ञ् उपस्थित असतील. यामध्ये देश विदेशातील 200 हुन अधिक कान, नाक, घसा तज्ञ् सहभागी असतील. यामध्ये शस्त्रक्रियांचे नवीन तंत्राचे शिक्षण देण्याबरोबर शस्त्रक्रियेसाठी विकसित वैद्यकीय उपकरणाचा प्रभावी वापर, गुणवत्तापुर्ण उपचार या विषयी परिसंवाद घेण्यात येईल. कानाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश असून यात कानातून पु स्त्राव येणे, कानाचे हाड सडणे तसेच ऐकू न येणे अश्या प्रमुख आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येतील.

या आंतरराष्ट्रीय SEOCON परिषदेसाठी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातील कान, नाक, घसा विभागातील प्राध्यापक डॉ. जी. डी महाजन, प्राध्यापक, डॉ. विनोद शिंदे, प्राध्यापक डॉ मयूर इंगळे व प्राध्यापक डॉ. परेश चव्हाण तसेच सुश्रुत ईएनटी हॉस्पिटल, तळेगाव दाभाडेचे डॉ. मुबारक खान व डॉ. सपना परब यांचे सहकार्य लाभले आहे.

होणाऱ्या या परिषदेत कानासंदर्भतील गरजू रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी संपर्क साधण्यासाठी प्राध्यापक डॉ. मयूर इंगळे – 9975788222 तसेच कॉल सेंटर क्र. 706 599 5999 डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय पिंपरी पुणे येथे संवाद साधावा.

Spread the love