Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

भारताने सलग दुसऱ्यांदा चीनला विश्वविक्रमात मागे टाकले ; गिनेस बुक ऑफ रकोर्डमध्ये नोंद

पुणे पुस्तक महोत्सवात चौथा विश्वविक्रम –

पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने वाचन संस्कृती वाढण्यासाठी भारताने संलग्न चौथा विश्वविक्रमाची नोंद गुरुवारी करण्यात आली. या विश्वविक्रमांतर्गत ११ हजार ४३ नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद ३० सेकंदात वाचण्याचा नवा विश्वविक्रम गिनेस बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंदवला आहे. यापूर्वी, असा रेकॉर्ड चीनच्या नावावर होता. या महोत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा चीनचा रेकॉर्ड मोडण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने विश्वविक्रमात पुन्हा एकदा भारताने चीनला मागे टाकले आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने २४ डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या, पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने विश्वविक्रम करण्यात येत आहेत. या शृंखलेत चौथा विश्वविक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदवण्यात आला. यावेळी संयोजक राजेश पांडे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, डॉ. डी. वाय. पाटील डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ कवयित्री दोन अरूणा ढेरे, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. संजय चाकणे, डॉ. आदित्य अभ्यंकर, प्रकाशक राजीव बर्वे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, सुनिताराजे पवार, मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते. हा विश्वविक्रम ‘ लार्जेस्ट ऑनलाइन अल्बम ऑफ पीपल रिडींग सेम पॅराग्राफ ऑफ मिनीमम ड्यूरेशन ऑफ ३० सेकंड’ या विषयावर नोंदविण्यात आला आहे. गिनेस बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्निल डांगरिकर यांनी अधिकृतपणे विश्वविक्रमाची घोषणा केल्यानंतर, उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी जल्लोष करीत आनंदोत्सव तिरंगा फडकवत आणि फुगे सोडून साजरा केला. पुणे पुस्तक महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या मधुमिलन मेहेंदळे, राजीव बर्वे, सुनिताराजे पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हा विश्वविक्रम करण्यात आला आहे. या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी महत्त्वाची अतिशय उत्तम पध्दतीने वाचन करून लोक व्हिडीओ तयार केले आहेत. सर्वांचा आशय एकच हवा, डुप्लिकेशन असता कामा नये अशी आव्हाने त्यात आहेत. त्यामुळे फेस रेकग्निशन तंत्राचा वापर करण्यात येत आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांकडून परिच्छेद वाचून घेऊन व्हिडिओ तयार करण्यात येत आहेत. तसेच राज्यभरातून नागरिक व्हिडिओ पाठवले आहेत. हा परिच्छेद हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात आल्याने देशभरातून आणि परदेशातूनही व्हिडिओ आले आहेत, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नोलॉजीचे प्रमुख आदित्य अभ्यंकर यांनी सांगितले. उच्च व तत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत यांनी पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने फिरत्या वाचनालयाची माहिती देत, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांचे अभिनंदन केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
………
कोट
….
पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना या निमित्ताने एकप्रकारे इंटर्नशिप मिळाली आहे. त्यांनी १४ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. या व्हिडिओंचा डेटा ॲनालीसिस, प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग, व्हिडिओ प्रोसेसिंग शिकता आले. त्यांना दोन क्रेडिट मिळणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने सामान्य नागरिक, प्राचार्य, आयटी कर्मचारी यांच्याशी चर्चा करता आली. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

  • डॉ. आदित्य अभ्यंकर, विभागप्रमुख, तंत्रज्ञान विभाग

    कोट

    पुस्तकांच्या वाचनामुळे माणूस घडतो. माणूस घडविण्याची ही प्रक्रिया यापुढेही पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने सुरू राहायला हवी. महोत्सवात लेखन आणि वाचक म्हणून आनंद झाला आहे. या महोत्सवाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्तम आहे. दिल्ली, जयपूर, कलकत्ता येथील पुस्तक महोत्सवाच्या तोडीचा पुणे पुस्तक महोत्सव भरवला आहे. या महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या राजेश पांडे आणि टीमचे अभिनंदन केले पाहिजे.
  • डॉ. अरूणा ढेरे, ज्येष्ठ कवियत्री
    ….
Spread the love