Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

विद्या प्रतिष्ठान,बारामती येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर युथ डेव्हलपमेंट’चे उद्घाटन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीन जी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर डेअरी या प्रकल्पाचे उद्घाटन आज केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली,सर्व विश्वस्त,शासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार पडले.

या प्रकल्पामुळे देशी गोवंशातील दूध वाढविण्याच्या समस्यांवर संशोधन होऊन त्या दूर होणार आहेत तसेच येथील कृत्रिम रेतन व एम्ब्रियो ट्रान्स्फरच्या माध्यमातून चांगल्या दुधाळ जनावरांची निर्मिती आणि उच्च उत्पादकतेची वंशावळ असणाऱ्या वळूंच्या विर्यमात्रेचा पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. ४२ वर्षांपूर्वी दुग्धक्रांती होण्याआधी माझे वडील स्व.आप्पासाहेब पवार व स्व.मणीभाई देसाई यांनी क्रॉसब्रीड गाई आणून त्या पाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले,त्यामुळे दुष्काळातही शेतकऱ्यांना जोडधंदा मिळालाय.मधल्या काही काळात मात्र गाईंच्या ब्रीडिंग,फीडिंगची शास्त्रीय काळजी न घेतल्याने त्यांची उत्पादकता कमी झाली,या प्रकल्पाच्या माध्यमातून यास पुन्हा उर्जितावस्था देण्याचे काम संस्थेमार्फत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राजकारणाव्यतिरिक्त विकासाची दूरदृष्टी असणारे नेते म्हणजे गडकरी साहेब,हा प्रकल्प जरी पशुसंवर्धन विभागाशी संलग्न असला तरी याची व्याप्ती सर्वदूर पसरण्याचा उद्देशाने गडकरी साहेबांच्या हस्ते आजचा कार्यक्रम घेतला.अशाच प्रकारची विकासाची दूरदृष्टी सर्वच लोकप्रतिनिधींनी ठेवून देशामध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प निर्माण करणे आज गरजेचे आहे…राजेंद्र पवार.

Spread the love