Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

‘हंट्समॅन इंडिया’ तर्फे भांबोली गावात हायस्कूल उभारणार!

चाकण, पुणे, : हंट्समॅन इंडिया, या वेगवेग़ळ्या रसायनांचा जागतीक निर्माता आणि वितरक असलेल्या चाकण, पुणे येथील स्टेट- ऑफ-द-आर्ट पॉलीयुरेथेन उत्पादन प्लांटला आज दहा वर्ष पुर्ण झाल्याच्या स्मरर्णाथ म्हणाले की, या भागातील आसपासच्या १८ ते २० गावामधिल ५ वी ते १२ वी च्या अंदाजे ११८० विद्यार्थ्याकरीता जागतिक उच्च दर्जाचे शिक्षण सुविधा पुरविण्यासाठी भांबोली गावात एक नविन उच्च माध्यामिक शाळा उभारणार आहे. भामचंद्र विद्यालयाला म्हणून ओळखले जाणारे, जे की 1990 सालापासून कार्यरत आहे.

नवीन शाळेच्या इमारतीसाठी हंट्समनच्या प्रस्तावित योजनेमुळे वरील परिस्थिती बदलणार आहे. मूलभूत सुविधांव्यतिरिक्त शाळेमध्ये एक अनोखे सुसज्ज खेळाचे मैदान जे की रिसायकल पॉलीयुरेथेन सामग्रीने तयार करण्यात येईल, स्टेट- ऑफ-द-आर्ट शैंक्षणीक सुविधा जसे की STEM शैंक्षणीक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा आणि माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण देईल. शाळेत जाण्यासाठी लांबचा प्रवास करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हंट्समन विद्यार्थ्यांसाठी बससेवाही उपलब्ध करून देईल.

याप्रसंगी श्री. राहुल टिकू, एमडि, इंडिया सबकॉन्टिनट, हंट्समॅन ईंनटरनॅशनल (इंडिया) म्हणाले की, ”चाकण येथे १० वर्षापुर्वी स्थापन झालेली आमची हि साइट एक यशाचा किरण आहे. ती एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि जगभरातील उद्योगासाठी सुरक्षित व टिकाऊ रासायनिक सोलुशन बनविते.प्लाट्मध्ये सुरळीत कामकाज चालविण्यासाठी टीममधील प्रत्येक सदस्याने केलेल्या मेहनतीचे आणि परिश्रमाचे मी मनापासून कौतुक करतो. हा विलक्षण असा वर्धापन दिन साजरा करताना आम्हाला अधिक आनंद होत आहे.

आम्हाला खात्री आहे की आमचा पॉलीयुरेथेन व्यवसाय पुढील काही वर्षांत भरभराटीला येईल आणि आभाळा ऐवढी ऊच्ची प्राप्त करेल. आमच्या भागातील तरुण आणि हुशार मुलांसाठी एक अत्याधुनिक माध्यमिक शाळा सुरू करून चाकणच्या लोकांशी असलेले आमचे नाते आणखी घट्ट करताना आम्हाला आनंद होत आहे. पुढील दशकात आणि त्यानंतरच्या काळात तरुण मनांना प्रज्वलित करण्यासाठी, उच्च कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत”.

त्यानंतर श्री. रायोमंद सबावाला, हेड सी.एस.आर. आणि डिरेक्टर फायनांस, हंट्समॅन ईंनटरनॅशनल (इंडिया), म्हणाले की, ” भांबोलीतील मुलांसाठी शाळेच्या इमारतीची पायाभरणी करत असताना आज हंट्समॅनसाठी खरोखरच लाल अक्षरांनी अधोरेखित करणारा दिवस आहे. तरुण मनांसाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, आणि या वंचित मुलांचे भविष्य घडवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणाऱ्या कंपनीशी निगडीत असल्याचा मला अभिमान आहे. आमच्या आजच्या उपक्रमाचा पुढील पिढीच्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे”.

हंट्समनसाठी जागतिक स्तरावर चाकण हे प्रमुख उत्पादन केंद्र आहे, आणि भारतातील कंपनीच्या मोठ्या उत्पादन साइट्सपैकी एक आहे. ही साइट जागतिक मानकांचे पालन करून तयार केले गेलेली आणि सुरक्षित व पर्यावरणास अनुकूल ऑपरेशन्स सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हि साइट MDI-आधारित व्यवसाय युनिट्ससाठी लागणारे पॉलीयुरेथेन्सचे उत्पादन करून शेजारच्या देशातील पादत्राणे, ऑटोमोटिव्ह आणि बांधकाम क्षेत्रातील ५०० पेक्षा अधिक ग्राहकांना सेवा पुरविते.

गेल्या काही वर्षांपासून, या साइट्ने पर्यावरणावरील परिणाम कमीतकमी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आपल्या संसाधनांचा उत्कृष्ट वापर केला आहे. चाकण प्लांट आणि परिसरातील लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने उत्पादन केंद्राने अतुलनीय कामगीरी केली आहे


Spread the love