भारताचा ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा याने भालाफेक खेळात सुवर्णपदक पटकावून देशाच्या क्रीडाविश्वात नवा अध्याय रचला आहे.

नीरज चोप्राच्या कामगिरीनं सुवर्णपदकांचा दुष्काळ संपलादेशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झालेय…
अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना
नीरज चोप्राच्या या सुवर्ण पदकासह भारताने आजपर्यंतच्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.
नीरज चोप्रा यांच्यासह भारताच्या ऑलिम्पिक पथकातील सर्व खेळाडू या इतिहासाचे रचनाकार आहेत,
आम्हा देशवासियांना या सर्व खेळाडूंचा अभिमान आहे.



“टोकियो ऑलिंपिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रानं आज इतिहास रचला आहे.
सुवर्णपदकासोबत देशाचा गौरव वाढवला आहे.
कोट्यवधी देशवासियांची मनं जिंकली आहेत. त्याच्या कामगिरीनं ऑलिंपिक सुवर्णपदकाचा दुष्काळ आज संपला आहे.
देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झालेय. नीरज चोप्राचं मन:पूर्वक अभिनंदन”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, नीरज चोप्रानं भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकानं पदकतालिकेतंच नव्हे तर जागतिक क्रीडाविश्वात भारताचा गौरव वाढला आहे.
नीरज चोप्राचं सुवर्णपदक मैदानीखेळांकडे पाहण्याचा देशवासियांचा दृष्टीकोन बदलेल.
मैदानी खेळांना लोकप्रियता, वलय मिळवून देईल. भारतीय युवकांना मैदानी खेळांकडे वळण्यासाठी प्रवृत्त करेल.
नीरज चौप्राचं सुवर्णपदक त्याच्या सातत्यपूर्ण, कठोर मेहनतीचं यश आहे. नीरज चोप्राचं, त्याच्या सहकाऱ्यांचं, प्रशिक्षक, मार्गदर्शक, चाहत्यांचंही सुवर्णपदकाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी नीरज चौप्राच्या सुवर्ण कामगिरीचं कौतुक करुन अभिनंदन केलं आहे.
जाहिरात / प्रसिद्धिसाठी
संपर्क: शिवाजी मा. हुलवळे
संपादक: छत्रपती मिडीया ग्रुप
पत्रकार – छायाचित्रकार
9422306342 / 8087990343
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !