Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

“आरोग्य ही आपली मोठी संपत्ती आहे तोच खरा दागिना आहे आणि निरोगी राहण्यासाठी आरोग्य चांगले ठेवणे ही परमेश्वराची सेवा आहे” – डॉ भाग्यश्रीताई पाटील

जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व जनजागृतीपर व्याखानमाला उत्साहात संपन्न

“मनाची अवस्था निरोगी व तणाव मुक्त ठेवायची असेल तर विचारांची देवाण घेवाण व्हायला हवी” – कवी अनंत राऊत

पिंपरी दि १४ नोव्हेंबर – पिंपरीतील डॉ. डी. वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व जनजागृतीपर व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली.

“आरोग्य ही आपली मोठी संपत्ती आहे तोच खरा दागिना आहे आणि निरोगी राहण्यासाठी आरोग्य चांगले ठेवणे ही परमेश्वराची सेवा आहे. स्वतःची काळजी घेत आहार, व्यायाम, बंधने आदींद्वारे मधुमेहावर मात करू शकतो”. आज भारत मधुमेहाची राजधानी ठरली आहे. मधुमेह रोखण्यासाठी सर्वोतोपरी कार्यरत राहून मधुमेह मुक्तीसाठी आम्ही अग्रेसर राहू असे – डॉ भाग्यश्रीताई पाटील प्र कुलपती यांनी उदघाट्न प्रसंगी मत व्यक्त केले.

“मनाची अवस्था निरोगी व तणाव मुक्त ठेवायची असेल तर विचारांची देवाण घेवाण व्हायला हवी” असे सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक श्री अनंत राऊत म्हणाले. मधुमेहा पासून दूर रहायचे असल्यास मन प्रसन्न ठेवा, हसा, सकारात्मक रहा , चिंता मुक्त व आनंदी रहा” असा संदेश त्यांनी दिला. हसत खेळत साधलेल्या संवादातून सर्वांचीच मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी कवीतेतून सर्वाचीच दाद मिळवली. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग.. ताणतणाव मुक्तीतून मधुमेह मुक्ती’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

“मधुमेह हा आपल्या जीवनशैलीचा घटक झालेला आहे त्यावर मात करण्यासाठी शिबीर व जनजागृतीपर व्याख्यानाच्या अनुकरणातून एक नवी पिढी घडेल” असे मत कुलगुरू डॉ एन जे पवार यांनी व्यक्त केले.

जनजागृतीपर व्याख्यानमाला सत्रात व्याख्यानामध्ये –
डॉ वृषाली पाटील प्रसिद्ध ट्रान्सप्लांट सर्जन यांनी स्वादुपिंड प्रत्यारोपणाबाबतीत माहिती दिली स्वादुपिंडाचे कार्य, आजार, उपाय आदी विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. शुभांगी कानिटकर – मेडिसिन विभाग प्रमुख यांनी मधुमेहाची वास्तविकता या विषयावर मधुमेही रुग्णांची सद्यस्थिती तसेच आगामी काळात त्याची भीषणता व्यक्त केली. चुकीचा आहार, लट्टपणा , मानसिक तणाव, जीवन शैली सुधारण्याबाबत भाष्य केले.

डॉ विजयाश्री गोखले – प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ – यांनी मधुमेह म्हणजे काय? कश्यामुळे होतो? कारणे, लक्षणे, प्रकार व वर्गीकरण आदी विषयी विस्तृत स्वरूपात मांडणी केली.

डॉ अनु गायकवाड प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ – यांनी मधुमेह रिव्हर्सल विषयी व्याख्यान दिले यामध्ये मधुमेह रिव्हर्सलसाठी आहार, व्यायाम व दहा ते पंधरा किलो वजन कमी करून तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करावा. हे केल्याने मधुमेहींची औषधे व ईन्सुलीन कमी होतात मधुमेह नियंत्रित आल्यावर सुद्धा स्वतःने स्वतःची काळजी घेत आपले आरोग्य जपले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले या आजाराविषयी व स्वतः बाबतीत मधुमेह रुग्ण मधुमेह तज्ञ् झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले खळीमेळीच्या वातावरणात त्यांनी संवाद साधला

डॉ विनायक हराळे – मधुमेह तज्ज्ञ व एंडोक्राइनोलॉजी तज्ज्ञ यांनी अनियंत्रित मधुमेहाची करणे आजार नियंत्रित करण्यासाठी उपाय योजनांबाबती मार्गदर्शन केले

डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील, विश्वस्त डॉ यशराज पाटील यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्र- कुलपती डॉ भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ एन जे पवार, शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ वत्सला स्वामी, डॉ ए एल काकराणी, वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता डॉ जितेंद्र भवाळकर, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील राव, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ शुभांगी कानिटकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ एच एच चव्हाण व प्रमुख व्याख्याते उपस्थित होते.

आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी, हिमोग्लोबिन, बी पी, इसीजी तपासणी, (डायबेटिक न्यूरोपॅथी) पायांच्या नसांची तपासणी, (डायबेटिक रेटिनोपॅथी) डोळ्यांच्या नसांची तपासणी, भौतिकोपचार, व्यायाम आणि आहार मार्गदर्शन, मधुमेही रुग्णांच्या पायाची काळजी संबधी (डायबेटीक फुट) व स्वादुपिंड प्रत्यारोपणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते या शिबिरात 400 हून अधिक नागरिकांनी तपासणी केली तर व्याख्यान कार्यक्रमात 600 हुन अधिक सहभागी होता.

हा एकदिवसीय कार्यक्रम डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ जितेंद्र भवाळकर यांनी केले सूत्रसंचालन दिगंबर ढोकले तर आभाप्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील राव यांना केले.
……………………………..

Spread the love