Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

ज्ञानविकास प्रतिष्ठानच्यावतीने खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व संस्थापक अध्यक्ष उदयसिंह मुळीक व सचिव सौ.कल्पनाताई मुळीक संचलित भव्य क्रिडा व मॅरेथाॅन स्पर्धांचे उद्घाटन

साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानविकास प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित क्रिडा स्पर्धांचे प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते उद्घाटन फ्लॅग दाखवून करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.प्रदेश उपाध्यक्ष भगवानराव सांळुखे होते.यावेळी हडपसर मतदार संघाचे अध्यक्ष शंतनु जगदाळे,कार्याध्यक्ष संदीप बधे,अमर तुपे,बाळासाहेब कवडे,अनुपमा दातार,मोहमद्दीन खान,गणेश भोईटे,मंगेश चव्हाण,हनुमंत सत्रे,मानव मुळीक,सोनु टिळेकर,रमेश गायकवाड,दिशा मुळीक,आनंद जाधव,बाळासाहेब पासलकर,विशाखा मुळीक,क्रिएटिव्ह इंग्लिश मिडीअम स्कूलच्या मुख्यध्यापिका साधना सालके,प्रशिक्षक दुर्गाडे सर,संतोष चोरमले,परदेशी,सुजित मुळीक,लियाकत महाजन यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रशांतदादा जगताप म्हणाले की,तरूणांनी शारिरीक संपदा जपली पाहीजे या स्पर्धातून उद्याचे स्पर्धक घडतील असा मला विश्वास आहे. या मॅरेथाॅन स्पर्धेत दोन गटात मुलामध्ये प्रदीप माने,परमेश्वर घोडके तर मुलीमध्ये वैष्णवी जावळे,पौर्णिमा कुंभारकर यांनी प्रथम क्रमांक पटकवला.

या मॅरेथान स्पर्धेत ८०० स्पर्धकांनी भाग घेतला तसेच पालक वर्गाचा तेवढाच प्रतिसाद स्पर्धकांचा होता त्यांनी उत्साह वाढवला.

Spread the love