Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

गुजरात येथील मोरबी दुर्घटना – रा. स्व. संघ कर्तव्य भावनेने सक्रिय

🔹 घटनेनंतर काही मिनिटांतच रा.स्व. संघ जिल्हा संघचालक आणि सह विभाग कार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक बचाव कार्यामध्ये सहभागी झाले.

🔸 समाजाच्या सहकार्याने सर्व गटांतील रक्ताची व्यवस्था.
🔹 संध्याकाळपासून रात्रीपर्यंत सुमारे 200 स्वयंसेवक आवश्यक कार्यांमध्ये जोडले.

🔸 प्रशासन व्यवस्थेचे त्वरित कार्य आणि आपसातील सहकार्यामुळे कामाला गती.
🔹 टेलिफोन हेल्प लाईनसाठी सहाय्य.

🔸 पोहणाऱ्यांकडून पुलापासून जखमी नागरिक आणि मृतदेहांना स्ट्रेचरमधून रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्याची मदत.
🔹 रुग्णवाहिका वेळेत हॉस्पिटलपर्यंत पोहोचावी यासाठी दोन कॉरिडोरची निर्मिती.

🔸 हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षापर्यंत पोहोचण्यात सहाय्य.
🔹 मृतदेहांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी देखरेख.

🔸 कुटुंबांचे सांत्वन आणि संवेदनेसोबतच मृतदेह ओळखण्यास मदत.
🔹 तत्काळ माईक व्यवस्था, आवश्यक मार्गदर्शन ,

प्रशासन, संघ स्वयंसेवक, सामाजिक संस्था-कार्यकर्ते, भारतीय सेना व NDRF च्या संयुक्त, त्वरित आणि संवेदनशील प्रयत्नांमुळे मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 140 जणांचा मृत्यु झाला आहे. सुमारे 180 जखमी नागरिकांपैकी बहुतेकांना बरे वाटल्यावर हॉस्पिटलमधून डिस्जार्ज देण्यात आला आहे. दोन रुग्णांवर स्पाईन सर्जरी मोरबीपासून 50 किमी दूर असलेल्या राजकोट शहरात करण्यात आली आहे.

मदत आणि बचाव कार्य यासाठी हॉस्पिटलमध्ये संघाचे सुमारे 130 कार्यकर्ते सामाजीक संस्था आणि प्रशासनासोबत सक्रिय होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रांत-प्रचारकांशी प्रत्यक्ष बोलून मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन रा.स्व. संघाकडे सोपवले होते. हॉस्पिटलमधून आता सर्व रुग्णांना सोडण्यात आले आहे. सर्व मृतदेह नागरिकांकडे सोपविण्यात आले आहे.

घटना घडताच रा.स्व. संघाचे विभाग सह-कार्यवाह, जिल्हा कार्यवाह तसेच इतर कार्यकर्ते पाच मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले. तसेच प्रांत प्रचारक अवघ्या २ तासात दुर्घटना स्थळी पोहोचले. रा.स्व. संघाचे क्षेत्र संघचालक, प्रांत संघचालक आणि प्रांत कार्यवाह यांनीही घटनास्थळाला भेट दिली.
माहिती स्त्रोत – विश्व संवाद केंद्र गुजरात संपर्क – पंकज रावळ – 7083711949

Spread the love