Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

महाआरोग्य शिबीर जनहिताच्यादृष्टीने महत्वपूर्ण-आ.चेतन तुपे-पा

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात गोरगरीबांसांठी सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीर जनहिताच्यादृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे मत आ.चेतन तुपे-पा यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी,पुणे शहर,लायन्स क्लब ऑफ कात्रज,पुणे,ज्ञानविकास प्रतिष्ठान व मायमाऊली केअर सेंटरसह ताराचंद हाॅस्पीटल,एच.व्ही देसाई व कर्णे हाॅस्पीटलच्यावतीने सर्व परिसरातील नागरिकासाठी मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.सुखसागर नगर साईनगर राजीव गांधी नगर कात्रज कोंढवा परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

637 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी 66 नागरिकांची नोंद झाली. व 274 जणांनी बीपी शुगर तपासणीचा लाभ घेतला व 160 जणांना मोफत चष्मे वाटप केले, 105 नागरिकांनी कॅल्शियम मशीनद्वारे कॅल्शिअम तपासणी केली व 105 जणांना मोफत कॅल्शियमची औषधे देण्यात आली 310 जणांना मोफत कॅल्शियमची औषधे देण्यात आली । त्याचे उद्घाटन कार्यक्षम नगरसेवक प्रकाशभाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.चेतन तुपे-पा.होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नगरसेविका सौ.संगिताताई ठोसर,रा.प्रदेश उपाध्यक्ष भगवानराव साळंखेुु,गंगाधर बधे,डाॅ.शंतनु जगदाळे,संतोष नांगरे,हेमंत बधे,भूषण बधे,हनीफ पठाण,पूनमताई पाटील,स्वाती चिटणीस,अमोल भोसले,ला.सुरेश मेहता,ला. जयंत मुळे,ला.भानुदास पायगुडे,ला. मालती खन्ना,ला. हेमलता जैन,ला. सुनील मोहिते,ला. जितेंद्र लिमन, ला.विशाल वरुडे पाटील,पियुष मोहीते,स्नेहल जाधव,किर्ती भडंगे,योगेश पवार,हनुमंत सत्रे,मंगेश चव्हाण,सोनु टिळेकर,शुभम चव्हाण,अमोल कांबळे आदी उपस्थित होते.प्रास्ताविकात उदयसिंह मुळीक यांनी

समाज हिताच्यादुष्टीने गेली ३० वर्षे सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,राजकारण आदि क्षेत्रात भरीव योगदान देताना नेहमी खूपच मनस्वी आनंद वाटत आलेला असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी डाॅ.शंतनु जगदाळे यांनी आयर्नमॅन किताब पटकावल्याबद्दल त्यांचा हडपसर नागरी गौरव सन्मान तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रल्हाद मोरे,लियाकत महाजन यांचा ज्येष्ठ नागरिक गौरव आ.चेतन तुपे-पा.यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रकाश कदम यांनी मनोगतात या शिबीराच्या आयोजनाबद्दल संयोजकाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे संयोजन रा.काॅ.पा.पुणे शहर सरचिटणीस उदयसिंह मुळीक व ज्ञानविकास प्रतिष्ठानच्या सचिव सौ.कल्पनाताई मुळीक यांनी केले.

Spread the love