Chatrapati News India

News Media Event Coverage Press Release Publicity

अटलजींच्या जयंतीनिमित्त जुन्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता समारंभ

श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची कार्यकर्त्यांना सूचना

श्रद्धेय अटलजी अतिशय नम्र व्यक्तीमत्व होतं. त्यामुळे त्यांनी असंख्य कार्यकर्ते पक्षाशी जोडले. त्यांच्यासारखी नम्रता कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे, अशी सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केली. भाजपा पुणे शहराच्या वतीने कोथरुड मधील नळस्टॉप चौक येथे भारतरत्न अटलबिहारी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, सरचिटणीस राघवेंद्रबापू मानकर, प्रतिक देसरडा, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, कोथरुड मंडल सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा अनुराधा एडके, दीपक पवार, कुलदीप सावळेकर, मिताली सावळेकर, कोथरुड दक्षिण महिला मोर्चा सरचिटणीस स्वाती मोहोळ यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष वाढीत अटलजींनी कार्यकर्त्यांशी जपलेलं नातं अतिशय महत्त्वाचे होते. आपल्या नम्र स्वभावामुळे त्यांनी असंख्य कार्यकर्ते भारतीय पक्षाशी जोडून संघटन वाढविले. त्यामुळे विरोधकांना ही अटलजींचा हेवा वाटायचा. अटलजींसारखा नम्रपणा प्रत्येक कार्यकर्त्याने जपला पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष वाढविण्यात अनेकांचे बहुमूल्य योगदान राहिले आहे. अनेकांच्या कठोर परिश्रमामुळे भारतीय जनता पक्षाचे विचार जनमानसात रुजले, आणि आज इथपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अशा सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे सदैव स्मरण करणे, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, ही प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. श्रद्धेय अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजपा पुणे शहराच्या वतीने आज अशा सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. सर्व कार्यकर्त्यांनी नेहमीच ऋणात राहिले पाहिजेत.

यावेळी भाजप चे जुने जाणते कार्यकर्ते विश्वासराव हर्षे, विश्वास पाटील, बाळासाहेब शेडगे, उर्मिला ताई आपटे, भगवानराव मोहिते, जनार्दन क्षीरसागर, विलासराव बगाटे, मोहनराव शिगवण यांना नामदार पाटील यांच्या हस्ते कृतज्ञता पत्र देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Spread the love