सन २०२२ ते २०२७ करीता निवड
बँकेचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापित सुवर्णयुग सहकारी बँक मर्यादित पुणे च्या सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळाची नियुक्ती झाली आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली असून नवनियुक्त संचालक मंडळाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणरायाचे दर्शन घेत आरती देखील केली.



ट्रस्टचे उत्सवप्रमुख विश्वस्त व पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण त्याचप्रमाणे गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या पुढाकाराने ही निवडणूक बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

नवनियुक्त संचालक मंडळामध्ये हेमंत रासने, राजेंद्र सूर्यवंशी, राहुल चव्हाण, अमर कोद्रे, बाळकृष्ण सातपुते, नितीन राऊत, राजेंद्र पायमोडे, इंद्रजित रायकर, सुनील जाधव यांसह राखीव विभागातून महिलांमध्ये शोभा गोडसे, आसावरी रायकर व पुरुष राखीव गटातून चंद्रकांत मंचे, सुनिल माने यांची नियुक्ती झाली आहे. सहकार विभागाकडून शाहूराज हिरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

बँकेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, सुवर्णयुग सहकारी बँकेची स्थापना सन १९७३ साली झाली. बँकेच्या पुणे जिल्ह्यात २० ठिकाणी शाखा आहेत. बँकेच्या ८५० कोटी रुपयांच्या ठेवी असून ६५० कोटी रुपयांची कर्ज आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षात बँकेतर्फे विविध योजना व उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने समाजातील कमकुवत घटकांसाठी व गरीबांसाठी योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.



बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली असून नवनियुक्त संचालक मंडळाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणरायाचे दर्शन घेत आरती देखील केली.
More Stories
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणे डॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटन
मा.नरेंद्र मोदींच्या प्रगती पर्वाचा विजय – प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर.
दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !